मुंबई - कोरोना विषाणूचे भारतात ६० हुन अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईत २ तर, नागपुरात १ नवीन रुग्ण आढळला असून राज्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या ११ वर गेली आहे. २ दिवसांपूर्वी पुण्यात आढळलेल्या २ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ६ जणांना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी मुंबईतील दोघा सहप्रवाशांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांच्या रक्ताच्या चाचण्या पुन्हा केल्या जात असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात अली आहे.
-
Ravindra H Thakare, Collector And District Magistrate, Nagpur, Maharashtra: A 45-year-old person has tested positive for #Coronavirus. The patient has travel history to the United States https://t.co/nzTsbZxRV4
— ANI (@ANI) March 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ravindra H Thakare, Collector And District Magistrate, Nagpur, Maharashtra: A 45-year-old person has tested positive for #Coronavirus. The patient has travel history to the United States https://t.co/nzTsbZxRV4
— ANI (@ANI) March 11, 2020Ravindra H Thakare, Collector And District Magistrate, Nagpur, Maharashtra: A 45-year-old person has tested positive for #Coronavirus. The patient has travel history to the United States https://t.co/nzTsbZxRV4
— ANI (@ANI) March 11, 2020
-
Maharashtra CM Uddhav Thackeray: 10 positive cases of #coronavirus have been found in the state so far, including 8 positive cases in Pune. pic.twitter.com/CeRYwSUqvU
— ANI (@ANI) March 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra CM Uddhav Thackeray: 10 positive cases of #coronavirus have been found in the state so far, including 8 positive cases in Pune. pic.twitter.com/CeRYwSUqvU
— ANI (@ANI) March 11, 2020Maharashtra CM Uddhav Thackeray: 10 positive cases of #coronavirus have been found in the state so far, including 8 positive cases in Pune. pic.twitter.com/CeRYwSUqvU
— ANI (@ANI) March 11, 2020
चीनमधील वुहान प्रांतात आढळून आलेला कोरोना विषाणू जगभरात पसरला आहे. यामुळे आत्तापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाची बाधा झालेले ११ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ८ जणांवर पुण्याच्या नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नव्याने आढळलेल्या दोन जणांना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या त्या दोन जणांना विलगीकरण कक्षात इतर संशयित रुग्णांपासून वेगळे ठेवले जाणार आहे. त्यांच्या रक्ताच्या चाचण्या पुन्हा करण्यात आल्या आहेत. त्याचे रिपोर्ट येत्या काही तासात येतील, असे पालिका प्रशासनानाने कळविले आहे. तर, नागपुरातही एका ४५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालिकेची यंत्रणा सज्ज -
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात २८ बेडची व्यवस्था असून ‘कोरोना’ रक्त चाचणीही करण्यात येत आहे. शिवाय आपत्कालीन स्थितीसाठी पालिकेच्या महत्त्वाच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार ठेवला आहे. याचबरोबर ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सज्ज ठेवले असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्या -
‘कोरोना’ विषाणूंची लागण झाल्यास सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनालाही त्रास होतो. न्युमोनियासारख्या या आजारात मूत्रपिंडही निकामी होऊ शकते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांत ५ दिवस औषधोपचार करूनही आराम पडला नाही तर कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - रामदास आठवलेंनी हाकलून लावला 'कोरोना'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल..
दरम्यान, मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळांवर आजपर्यंत १,१९५ विमानांमधील १,३८,९६८ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नव्या आदेशानुसार, सर्वच देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची या विमानतळांवर तपासणी करण्यात येत आहे. यासोबतच परदेशवारी करून आलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
इराण, इटली आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये सध्या कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे २१ फेब्रुवारीनंतर या देशांमधून परत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. बाधित भागांमधून आतापर्यंत भारतात एकूण ६३५ प्रवासी आले आहेत, अशी माहिती ब्युरो ऑफ इमिग्रेशनने दिली आहे.
१८ जानेवारीनंतर राज्यामध्ये ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांमध्ये आतापर्यंत ३४९ जणांना भरती करण्यात आले आहे. यांपैकी ३१२ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामधील ३१२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत सात नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा - कोरोना व्हायरसच्या धसक्यामुळे मराठी सेलिब्रिटींचे धुळवडीचे कार्यक्रम रद्द