ETV Bharat / city

विशेष : आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालय आणि २० फुटांचा बॉम्बप्रूफ बोगदा!

author img

By

Published : Oct 9, 2021, 7:39 PM IST

या जेलला आर्थर रोड जेल म्हणून संबोधले जात असले तरी त्याचे खरे नाव मुंबई सेंट्रल जेल असे आहे. या जेलमध्ये विशेष न्यायालयही स्थापन करण्यात आले असून त्याकडे जाण्यासाठी २० फुटांचा बॉम्बप्रूफ बोगदाही बांधण्यात आला आहे. देशातील सर्वात जास्त गर्दी असलेल्या कारागृहांपैकी हे एक आहे.

Arthur Road jail
Arthur Road jail

मुंबई - कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली आहे. या आठ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चंटसह सह आरोपीना आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. या जेलला आर्थर रोड जेल म्हणून संबोधले जात असले तरी त्याचे खरे नाव मुंबई सेंट्रल जेल असे आहे. या जेलमध्ये विशेष न्यायालयही स्थापन करण्यात आले असून त्याकडे जाण्यासाठी २० फुटांचा बॉम्बप्रूफ बोगदाही बांधण्यात आला आहे. देशातील सर्वात जास्त गर्दी असलेल्या कारागृहांपैकी हे एक आहे.

हेही वाचा - वाचा : आर्यन खानला जामीन न मंजूर होण्याचे कारण आणि जेलमध्ये आर्यनला कशी मिळेल वागणूक?

आर्थर रोड जेल

मुंबईच्या सात रस्ता परिसरात १८४२ ते १८४६ दरम्यान मुंबईचे गव्हर्नर असलेल्या सर जॉर्ज आर्थर यांचे नाव रस्त्याला देण्यात आले. या रस्त्यावर ब्रिटिशांनी १९२५-२६मध्ये या कारागृहाची स्थापना केली. वास्तविक पाहता १९७०च्या दशकात कामगार चळवळीशी संबंधित शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते पंडित सदाशिव साने यांच्या नावावरून या रस्त्याचे नाव बदलून साने गुरुजी मार्ग असे करण्यात आले. या जेलचे अधिकृत नाव मुंबई सेंट्रल जेल असे असले तरी त्याला आर्थर रोड जेल या नावानेच ओळखले जाते. आर्थर रोड जेल हे नाव लोकप्रिय झाले असून संस्कृती, पोलीस आणि न्यायालयीन कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

केंद्रीय कारागृह म्हणून घोषित

स्वातंत्र्यपूर्व भारतातील कारागृहांवरील सर्वात प्राचीन उपलब्ध कागदपत्रांपैकी मुंबईमध्ये दोन कारागृहांचा उल्लेख आहे. त्यावेळच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग असलेल्या विभागात या दोन जेलचा समावेश आहे. एकाचे नाव बॉम्बे कॉमन जेल तर दुसऱ्याचे नाव सुधारगृह असे आहे. बॉम्बे कॉमन जेल म्हणजे आर्थर रोड जेल तर सुधारगृह हे भायखळा येथे आहे. १९१९-२०च्या भारतीय जेल समितीचा अहवालानुसार त्यावेळची सर्वात जास्त गर्दी मुंबई प्रेसिडेन्सीच्या कारागृहांमध्ये आढळली होती. त्यात बॉम्बे कॉमन कारागृहाचे वर्णन "खूप जुन्या आणि अयोग्य इमारतींचा संग्रह आहे ज्यांचा दीर्घकाळ निषेध करण्यात आला तरीही ते वापरातच आहेत." आर्थर रोड कारागृहासह नंतर आणखी कारागृहे बांधण्यात आली. १९७२मध्ये हे केंद्रीय कारागृह म्हणून घोषित करण्यात आले.

बराक आणि अंडा सेल्स

आर्थर रोड कारागृह सहा एकरात पसरलेले आहे, ज्यात २० बराक आणि त्यांच्या आत सेल आहेत. कारागृहाची सध्याची क्षमता ८०० आहे, मात्र, इथे सध्या २ हजारांहून अधिक कैदी ठेवले जातात. जुलै २०२१मध्ये कारागृहात ८ नवीन बराक्स तयार करण्यात आले आहेत. त्यात अतिरिक्त २०० कैद्यांना ठेवण्यात येत आहे. याच जेलमध्ये अंड्याच्या आकारासाठी "अंडा सेल्स" नावाच्या उच्च-सुरक्षा असलेल्या बराक्स आहेत. या वर्तुळाकार सेलमध्ये मुस्तफा डोसा, अबू सालेम, अरुण गवळीसारखे गुंड आणि १९९३च्या बॉम्ब स्फोटाप्रकरणी तुरुंगवास भोगलेला अभिनेता संजय दत्तसारख्या कैद्यांना ठेवण्यात आले होते.

हेही वाचा - क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला दिलासा नाही, आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम

जेलमध्ये न्यायालय आणि बोगदा

मुंबईमधील १९९३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या खटल्यादरम्यान १३०हून अधिक लोकांवर खटला चालला होता, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव कारागृह परिसरात न्यायालय स्थापन केले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबच्या खटल्यासाठी २००९मध्ये उच्च सुरक्षा कक्ष बांधण्यात आला होता. त्याला विशेष न्यायालयात नेणे धोकादायक असल्याने २० फुटांचा बोगदा बांधण्यात आला आहे. बॉम्बने हल्ला केला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असा बॉम्बप्रूफ असलेला सुरक्षित असा बोगदा बांधण्यात आला आहे.

आर्यन खान जेलमध्ये क्वारंटाइन

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्स पार्टीप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज खान याच्यासह आठ जणांना अटक केली. त्यांना ७ ऑक्टोबरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यानंतर काल शुक्रवारी आर्यन खान असा सहा पुरुष आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये तर मुनमुन धामेचा व आणखी एका महिला आरोपीला भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे. या सर्व आरोपींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह असून पुढील तीन ते पाच दिवस त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आर्थर रोड जेलमध्ये कोरोनाचा प्रसार होऊन कैदी आणि कर्मचाऱ्यांना त्याची लागण झाली होती. त्यानंतर याठिकाणी बाहेरून येणाऱ्या कैद्यांना काही दिवस क्वारंटाइन केले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.