ETV Bharat / city

मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - आयसीटी - भ्रष्टाचार

मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाकडून करण्यात आलेले आरोप हे संपूर्ण खोटे आहेत. आम्ही त्यांच्या कर्मचारी संघाला विद्यापीठाकडून मान्यता न दिल्याने ते आमची बदनामी करत आहे, अशी माहिती आयसीटीचे डायरेक्टर भास्कर थोरात यांनी दिली.

आयसीटी
author img

By

Published : May 22, 2019, 10:04 AM IST

मुंबई - माटुंग्यातील नामांकित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (आयसीटी) या अभिमत विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला होता. यात आता मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघानेही उडी घेत आयसीटीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आयसीटीचे डायरेक्टर भास्कर थोरात

मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाकडून करण्यात आलेले आरोप हे संपूर्ण खोटे आहेत. आम्ही त्यांच्या कर्मचारी संघाला विद्यापीठाकडून मान्यता न दिल्याने ते आमची बदनामी करत आहे. त्यांच्या या कृतीमुळे देशातील नामवंत विद्यापीठाचे नाव खराब होत आहे. कर्मचारी संघाकडून करण्यात आलेले आरोप हे धादांत खोटे असून, विद्यापीठाचा कारभार हा पारदर्शक आहे. तसेच कर्मचारी संघाशी आमचा काही संबंध नाही, असे वक्तव्य डायरेक्टर भास्कर थोरात यांनी केले.

कर्मचारी संघाला आमच्या विद्यापीठात यायचे आहे. पण ते येथे येऊ शकत नाही. त्यामुळे ते काही लोकांना भडकावून आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. काही विद्यार्थी आमच्या विरोधात बोलत आहेत. त्यांच्या आणि मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या विरोधात आम्ही अब्रुनुकसानीचा दावा करणार आहोत, अशी माहिती थोरात यांनी दिली.

Intro:मुंबई ।
माटुंग्यातील नामांकित इंन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (आयसीटी) या अभिमत विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणाच आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला होता. यात आता मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघानेही उडी घेत आयसीटीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हे सर्व आरोप आय सी टी कडून फेटाळण्यात आले आहेत. हे आरोप धादांत खोटे आहेत आम्ही यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत असे आय सी टी चे डायरेक्टर भास्कर थोरात यांनी सांगितले.Body:मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाकडून करण्यात आलेले आरोप हे संपूर्ण खोटे आहेत. आम्ही त्यांच्या कर्मचारी संघाला विद्यापीठाकडून मान्यता न दिल्याने ते आमची बदनामी करत आहे. त्यांच्या या कृतीमुळे देशातील नामवंत विद्यापीठाचे नाव खराब होत आहे. कर्मचारी संघाकडून करण्यात आलेले आरोप हे धादांत खोटे असून, विद्यापीठाचा कारभार हा पारदर्शक आहे. त कर्मचारी संघाशी आमचा काही संबंध नाही आहे. भ्रष्टाचाराचे केलेले आरोप हे खोटे आहेत. कर्मचारी संघाला आमच्या विद्यापीठात यायचे आहे. पण ते इथे येऊ शकत नाही. त्यामुळे ते काही लोकांना भडकावून असे आरोप करत आहेत. काही विद्यार्थी देखील आमच्या विरोधात बोलत आहेत. त्याच्या आणि मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या विरोधात आम्ही अब्रुनुकसानीचा दावा करणार आहोत असे थोरात यांनी सांगितले.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.