ETV Bharat / city

महाआघाडी सरकार अहंकारी अन् अपयशी मात्र निर्णय तुघलकी, फडणवीसांचा घणाघात

author img

By

Published : Dec 13, 2020, 6:51 PM IST

कोरोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

devendra fadanvis a
देवेंद्र फडणवीस

मुंबई - विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी झालेल्या भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ता यांच्या डोक्यात गेली असून राज्यात अघोषित आणीबाणी आहे. महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटत आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

..त्यामुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित -

ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला कात्रीत पकडण्याचाही प्रयत्न या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत केला आहे. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. या विषयाबाबत सरकार गंभीर नाही. सरकारचे मंत्री आणि प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये जाऊन स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. ओबीसी समाजाच्या मनात भयाचे वातावरण असून सरकारची बोटचेपी भूमिका आहे, असं म्हणत फडणवीस यांनी आरक्षणप्रश्नी सरकावर गंभीर आरोप केले आहेत.

महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा -

कोरोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. कोरोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसंच अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीही सरकार का पाठ का थोपटून घेत आहे, ते समजत नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्यात अघोषित आणीबाणी -

राज्यात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असं वातावरण सध्या आहे. सरकारच्या विरोधात कोणी बोललं की तुरुंगात टाकलं जातंय, असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

अर्णब गोस्वामी आणि कंगना प्रकरणात न्यायालयाची चपराक -

अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेले निकाल ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. गोस्वामी आणि कंगनाच्या विचारांशी आम्ही सहमत नाहीत. मात्र, ज्या प्रकारे कारवाई झाली आणि जे कोर्टानं म्हणणं मांडले त्यानंतर या सरकारला चपराक बसली आहे. यातून सुधारण्याऐवजी सत्तेचा अहंकार हे सरकार दाखवत आहे.

या अहंकारी सरकारला आम्ही योग्य ते उत्तर देऊ. सरकारविरुद्ध संघर्ष करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. जनतेसाठी आम्ही सरकारला उत्तर देऊ. हे सरकार अहंकारी आहे या सरकारचे निर्णय हे तुघलकी आहेत. अधिवेशनात जो काही वेळ आम्हाला मिळेल त्यात आम्ही सरकारला जाब विचारणारच, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.