मुंबई - देशासह महाराष्ट्र सध्या कोरोना विरुद्धच्या लढाईत शड्डु ठोकून उभा आहे. त्याचवेळी राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज प्रतिस्पर्धी मात्र एकमेकांविरोधातच शड्डु ठोकताना दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील हा सामना सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधुन घेत आहे.
काय आहे प्रकरण...
काही दिवसांपुर्वी चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटील यांना खोचक सल्ला दिला होता. जयंतराव कोरोना विरूद्धच्या लढाईत आम्हाला सहभागी होण्याचे आवाहन करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना करा. शिवाय तुमच्या घटकपक्षांनाही त्याची अधिक गरज आहे. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडी सरकारच्या घटक पक्षांचे योगदान काय ? असा प्रश्न उपस्थित केला होता.
जयंत पाटलांनी काय दिले उत्तर?
चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नाला जयंत पाटील यांनी ट्विट करून जोरदार उत्तर दिले आहे. 'चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते’ असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
-
चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 12, 2020चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 12, 2020
हेही वाचा... #coronavirus : राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; राज्याची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये
जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना काळजीचा सल्ला आणि चिमटाही
त्यानंतर जयंत पाटीलांनी चंद्रकांत दादांना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. कोरोना आजाराचा धोका साठीच्या वरिल लोकांना अधिक उद्भवतो. त्यामुळे आपण अधिक बाहेर फिरू नका. स्वत:ची काळजी घ्या. काही कमी जास्त लागलं तर कळवा. मी आहेच ना मदतीला, अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत दादांची फिरकी घेतली.
-
भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत असतील तर आनंदच आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघायचे असल्यास @ncpspeaks हे फेसबुक व ट्विटर हॅन्डल वारंवार पाहण्याची सवय लावून घ्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काय काम करत आहेत, हे आपल्याला दिसेल.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत असतील तर आनंदच आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघायचे असल्यास @ncpspeaks हे फेसबुक व ट्विटर हॅन्डल वारंवार पाहण्याची सवय लावून घ्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काय काम करत आहेत, हे आपल्याला दिसेल.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 12, 2020भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत असतील तर आनंदच आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघायचे असल्यास @ncpspeaks हे फेसबुक व ट्विटर हॅन्डल वारंवार पाहण्याची सवय लावून घ्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काय काम करत आहेत, हे आपल्याला दिसेल.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 12, 2020
...मात्र राष्ट्रवादीचे फेसबुक व ट्विटर हॅन्डल पाहत चला
चंद्रकांत पाटलांना सल्ला देऊन जयंत पाटील तेवढ्यावरच थांबले नाही. चंद्रकांत पाटील यांच्या, कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडी सरकारच्या घटक पक्षांचे योगदान काय ? या मुळ प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघायचे असल्यास @ncpspeaks हे फेसबुक व ट्विटर हॅन्डल वारंवार पाहण्याची सवय लावून घ्या, असे सुचवले आहे.
एकंदरीत राज्यातील या दोन बड्या नेत्यांच्या ऑनलाईन युद्धाचा शेवट नेमका कसा होणार हे पहावे लागेल. तसेच जयंत पाटील यांना चंद्रकांत पाटील काय उत्तर देणार हे देखील पहावे लागेल.