मुंबई - आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना (Corona Cases) व्हायरसची लागण झालेल्या 16047 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच सक्रिय रुग्णांच्या (Active Cases) संख्येत घट झाली असून ही संख्या 1,28,261 वर पोहोचली आहे. काल देशात 12,751 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच, केवळ 24 तासांतच बाधितांचा आकडा वाढून 16 हजारांवर पोहोचला आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 5,26,530 वर येऊन पोहोचली आहे.
-
#COVID19 | India reports 16,047 fresh cases and 19,539 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Active cases 1,28,261
Daily positivity rate 4.94% pic.twitter.com/aZT3Y0AcKa
">#COVID19 | India reports 16,047 fresh cases and 19,539 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 10, 2022
Active cases 1,28,261
Daily positivity rate 4.94% pic.twitter.com/aZT3Y0AcKa#COVID19 | India reports 16,047 fresh cases and 19,539 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 10, 2022
Active cases 1,28,261
Daily positivity rate 4.94% pic.twitter.com/aZT3Y0AcKa
मुंबईत मंगळवारी कोरोनाचे ४७९ नवे रुग्ण - मुंबईत कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३०० च्या दरम्यान रुग्णसंख्या नोंद होत होती. त्यात वाढ होऊन बुधवार पासून रोज ४०० च्या वर रुग्णांची नोंद होत आहे. आज मंगळवारी ४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २६७ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
४७९ नवे रुग्ण - मुंबईत गेल्या २४ तासात ६,५८० चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४७९ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे. ३२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २८ हजार ४३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ५ हजार ६४६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३,१२७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १८५७ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३८ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्या वाढली - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६, ७ ऑगस्टला ४६५, ८ ऑगस्टला ४०७, ९ ऑगस्टला ४७९ रुग्णांची नोंद झाली आहे.
११५ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात ३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा - Radhanagari Dam : राधानगरी धरण 100 टक्के भरलं, पहाटे पहिला स्वयंचलित दरवाजे उघडला
हेही वाचा - Encounter In Budgam : जवानांनी तीन दहशतवाद्यांना घेरले, जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चकमक सुरू