ETV Bharat / city

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा एकदिवसीय उच्चांक; दिवसभरात तब्बल 1602 नवीन रुग्णांची नोंद

maharashtra corona updates
maharashtra corona updates
author img

By

Published : May 14, 2020, 10:36 AM IST

Updated : May 14, 2020, 8:49 PM IST

20:46 May 14

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा एकदिवसीय उच्चांक; दिवसभरात तब्बल 1602 नवीन रुग्णांची नोंद

मुंबई - महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात 1602 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, आतापर्यंत एका दिवसात आढळलेला कोरोनाबाधितांचा हा उच्चांक आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 512 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या एकूण 20, 441 कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

1602 नवीन कोरोनाबाधित रुग्ण :

आज (गुरुवार) दिवसभरात 1602 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण आकडा आता 27,524 झाली आहे.

44 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू :

आज (गुरुवार) दिवसभरात 44 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

512 कोरोनामुक्त रुग्ण :

आज (गुरुवार) दिवसभरात 512 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 6059 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

20:45 May 14

मुंबईत दिवसभरात तब्बल 998 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई - शहर परिक्षेत्रात आज दिवसभरात तब्बल 998 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण आकडा 16 हजार 579 वर पोहचला आहे. तसेच आज 25 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला असल्याने आतापर्यंत मृत्यूचा आकडा हा 621 वर पोहचला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही प्रशासनाच्या चिंतेत सातत्याने भर टाकत आहे.

20:44 May 14

नाशिकमध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा पोहचला 758 वर; मालेगावात 8 नवीन रुग्ण

नाशिक - जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 758 वर पोहचला आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यँत 459 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

20:44 May 14

मालेगावात 8 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक - मालेगाव येथे आज (गुरुवार) 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मालेगावात आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 593 वर पोहचला आहे.

20:43 May 14

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील आरोग्य विभाग सील

ठाणे - महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करणारी एक महिला लिपिकचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे  महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आरोग्य विभाग पूर्णतः बंद करण्यात आला आहे.

20:42 May 14

पालघरच्या ग्रामीण भागात कोरोनाचे 3 नवीन रुग्ण; नागरिकांच्या चिंतेत भर

पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले होते. तसेच या तिघांच्या संपर्कातील इतर 24 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

20:42 May 14

अकोल्यात 12 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

अकोला - जिल्ह्यात आज (गुरुवार) तब्बल बारा रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

20:31 May 14

रायगड जिल्ह्यातील खालापुरमध्ये आढळले कोरोनाचे 2 नवीन रुग्ण

रायगड - जिल्ह्यातील खालापुर तालुक्यात कोरोनाचे 2 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच आज (गुरुवार) दिवसभरात जिल्ह्यात एकूण 31 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

रायगडमध्ये आज कोरोनाचे 31 नवीन रुग्ण :

पनवेल मनपा - 20, पनवेल ग्रामीण - 07, खालापुर - 02, महाड - 01, पेण - 01

रायगडमध्ये दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे एकुण 286 एक्टीव्ह रुग्ण आहेत.

20:00 May 14

मुंबईत दिवसभरात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई - शहरात आज (गुरुवार) दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू  झाला आहे. सेवरी पोलीस ठाणे आणि शिवाजी नगर पोलीस ठाणे येथील प्रत्येकी एक पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

20:00 May 14

कोल्हापूरात आज दोन नविन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर उर्फ मलकापूरमधील 30 वर्षीय गरोदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच इचलकरंजीमधील 20 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे कोल्हापूरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 27 वर पोहचली आहे.

20:00 May 14

मुंबई ते बुलडाणा.. 8 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह चिमुकलीने केला प्रवास

बुलडाणा - एका 8 वर्षीय कोरोनाबाधित चिमुकलीने मुंबईहून बुलडाण्यापर्यंत परवानगी घेऊन प्रवास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

19:59 May 14

सोलापूरात आणखीन 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

सोलापूर - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढताना दिसत आहेत. सोलापूरात आज (गुरुवार) 22 नविन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 330 वर पोहचला आहे. तसेच आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

19:59 May 14

अकोल्यात गुरुवारी सापडले 10 नवीन कोरोना रुग्ण

अकोला - जिल्ह्यात आज (गुरुवार) सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालामध्ये दहा नविन कोरोना रुग्ण साडल्याची नोंद आहे. जिल्ह्यात 119 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

19:59 May 14

जालना जिल्हा सामान्य रुग्णायातील महिला डॉक्टरला कोरोनाची लागण

जालना - जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात रुग्ण तपासणी करणाऱ्या एका महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे.

19:00 May 14

पुणे शहरातील सदाशिव पेठेतील घाऊक बाजारपेठ पुढील तीन दिवस बंद राहणार

पुणे - शहरातील सदाशिव पेठेतील घाऊक बाजारपेठ उद्यापासून तीन दिवस बंद राहणार आहेत. बाजारोपेठेतील काही नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

18:15 May 14

ठाण्यात गजाआड असलेल्या ४ आरोपींना कोरोनाची लागण

ठाणे  - शहरात गजाआड असलेल्या ४ आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अंबरनाथ पोलीस ठाण्याला देखील आता करोनाचा विळखा बसला आहे.

15:16 May 14

मुंबई पोलीस दलातील आणखीन एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई - राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यातच करोनाविरुद्ध पहिल्या फळीत लढणाऱ्या पोलिसांना करोनाची मोठ्या संख्येने लागण झाल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. त्यातच आज मुंबई पोलीस दलातील आणखीन एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

15:16 May 14

'तुमच्यामुळे गावात कोरोना येईल' नागरिकांनी वाईन शॉपसमोर घातला गोंधळ

ठाणे - राज्यात ठिकठिकाणी वाईन शॉप सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ठाणे येथील अंबाडी गावात 'तुमच्यामुळे गावात कोरोना येईल' असे ग्रामस्थांनी एका वाईन शॉपच्या मालकाला चांगलाच इशारा दिला. तसेच ग्रामस्थांनी काहीवेळ वाईन शॉपसमोर गोंधळ घातल्याने अखेर पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.

15:15 May 14

नाशिकला पायी जाणाऱ्या मजुरांसाठी एसटीची सोय; अनिल देशमुखांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई - नाशिक महामार्गावरून गावाकडे पायी जाणाऱ्या मजुरांसाठी एसटीची सोय करण्यात आली आहे. मजुरांना गावी घेऊन  जाणाऱ्या या एसटीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  हिरवा झेंडा दाखवला आहे.

15:15 May 14

जालन्यात राज्य राखीव पोलीस दलाचे चार जवान कोरोना मुक्त

जालना - राज्यातील जनतेसाठी जालन्यातून एक मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य राखीव पोलीस दलातील पाच जवानांपैकी चार जवान कोरना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. हे चारही जवान मालेगाव येथील तुकडीत गेले होते.

15:15 May 14

अमरावतीत दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

अमरावती - आरोग्य कर्मचाऱ्यांना होणारी कोरोनाची लागण हा सध्या राज्यापुढील चिंतेचा विषय आहे. अमरावती येथे आरोग्य विभागाच्या चमूतील दोघांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

15:14 May 14

धक्कादायक : दापोलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला

रत्नागिरी - जिल्ह्यातील दापोली येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने त्याचा शोध घेण्यात येत आहे.

12:08 May 14

कोल्हापूरात परराज्यातील हजारो मजूर रस्त्यावर; गावाकडे जाण्यासाठी लगेचच रेल्वे सोडण्याची मागणी

कोल्हापूर - पुणे-बंगळुर महामार्गावर परराज्यातील हजारो मजूर रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसीमधील हे मजूर गावी जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरातून आत्तापर्यंत 3 रेल्वे परराज्यासाठी सोडण्यात आल्या आहेत. मात्र, या मजूरांनी आम्हाला सुद्धा घेऊन जा म्हणत रस्त्यावर गर्दी केली आहे.

10:58 May 14

नाशिकहून दीड हजार मजूर मध्यप्रदेशला रवाना

नाशिक - जिल्हा आणि परिसरात अडकलेल्या स्तलांतरीत मजूरांसाठी विशेष मजूर रेल्वेची सोय करण्यात आली आहे. गुरुवारी नाशिकहून 1500 परप्रांतीय मजूर विशेष रेल्वेने मध्यप्रदेशकडे रवाना झाले आहेत.

10:57 May 14

अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या जवळ...

अकोला - जिलह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या द्विशतकाजवळ आली आहे.  बुधवारी जिल्ह्यात 11 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

10:30 May 14

जालना जिल्हा 'रेड झोन'मध्ये; जिल्ह्यात 17 कोरोनाबाधित

जालना - जिल्ह्यात एकूण  कोरोनाबाधितांची संख्या ही 17 वर पोहचली आहे. तर जिल्ह्यात 1 रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 असून जालना जिल्ह्याचा समावेश रेडझोन करण्यात आला आहे.

10:30 May 14

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 15 हजार 581 वर; 596 जणांचा मृत्यू

मुंबई - शहरात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 15 हजार 581 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत शहर आणि परिसरात तब्बल 596 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3791 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

10:30 May 14

औरंगाबादेत 55 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

औरंगाबाद - जिल्ह्यात एका 55 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता 20 वर पोहचली आहे. तर मागील तीन दिवसांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

09:55 May 14

MAHA CORONA LIVE : बुधवारी राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक; 1495 रुग्णांसह एकूण संख्या 26 हजारच्या उंबरठ्यावर

मुंबई - बुधवारी राज्यात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 24 तासात करोनाचे तब्बल 1495 रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण रुग्णसंख्या 25922 वर पोहोचली आहे. राज्यात बुधवारी करोनाने 54 रुग्णांचा बळी घेतला. यात मुंबईतील 40, पुण्यातील 6, जळगावमधील 2, सोलापूर शहरातील 2, औरंगाबादधील 2, वसई- विरारमधील 1 तर रत्नागिरीमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या 54 मृत्यूंसह राज्यातील एकूण मृतांची संख्या 975 झाली आहे. राज्यभरात बुधवारी 422 रुग्णांना कोरोनावरील यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 5547 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Last Updated : May 14, 2020, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.