नाशिक - राज्यात सर्व प्रशासन यंत्रणा दिवसरात्र कोरोना विरोधात लढत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जिल्ह्याचा आढावा घेण्यास आलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी, मालेगावमध्ये अधिक पोलीस, डॉक्टर लागणार का हे पाहू. तसेच फ्रंट लाईनला काम करणऱ्या पोलिसांना पीपीई किट आम्ही देत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. तसेच कर्तव्यावर मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना 50 लाख आणि नोकरीही देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
कोरोना व्हायरस LIVE : कर्तव्यावर मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत आणि नोकरीही देऊ : गृहमंत्री
12:46 April 29
कर्तव्यावर मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत आणि नोकरीही देऊ : गृहमंत्री
12:46 April 29
गृहमंत्री आणि आरोग्यमंकत्र्यांकडून नाशिकमध्ये आढावा बैठक
नाशिक - गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाशिक मध्ये कोरोना विषाणूच्या अनुषंगाने बैठक घेत आहेत. या बैठकीला कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी उपस्थित आहेत.
11:53 April 29
अकोल्यातील 13 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त
अकोला - आज बुधवारी जिल्ह्यातील 13 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. सुदैवाने या सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
11:52 April 29
हिंगोलीत आढळला कोरोनाचा सोळावा रुग्ण
हिंगोली - दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार वसमत येथे क्वारंटाईन केलेल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 16 झाली आहे.
11:08 April 29
सतरंजीपुरा परिसरात राज्य राखीव पोलीस दल तैनात
नागपूर - सतरंजीपुरा परिसरात राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. सतरंजीपुरा परिसर नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषीत करण्यात आला असून सतरंजीपुरा आणि आजूबाजूच्या परिसरात 80 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
11:06 April 29
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव
कोल्हापूर - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला असून जिल्ह्यात कोरोनाचे 11 रुग्ण सापडले आहे. यात भुदरगड तालुक्यातील आकुर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
10:47 April 29
जाणून घ्या राज्यातील कोरोना व्हायरसची प्रत्येक महत्त्वाची घडामोड एका क्लिकवर...
मुंबई - राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट आता अधिकच गंभीर होत असल्याचे दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात कोरोनाचे 729 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 9318 झाली आहे. तर मागील 24 तासात झालेल्या 31 मृत्यूंसह राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आकडा 400 पर्यंत पोहोचला आहे. यातील दिलासादायक बाब म्हणजे काल एकूण 106 रुग्ण हे कोरोनावरील यशस्वी उपचारानंतर घरी गेले आहे. आतापर्यंत एकूण 1388 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत.