ETV Bharat / city

'अशा' कठीण प्रसंगात तरी भाजप नेत्यांनी जातीयवादाचे राजकारण थांबवावे - BJP Stop racism politics

भाजपच्या गेल्या सहा वर्षातील अत्यंत घिसाडघाईच्या व बेफिकीर कारभारामुळे देश पाठीमागे गेला आहे. या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिलेली परवानगी हे अशाच बेफीकीरीचे प्रतिक आहे. असे असतानाही तबलीगचा वापर करून जातीयवाद पसरवण्याचे राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांनी कृपा करून ते करु नका, अशी हात जोडून विनंती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

Congress leader Sachin Sawant
सचिन सावंत काँग्रेस
author img

By

Published : Apr 9, 2020, 10:34 AM IST

मुंबई - केंद्रातील मोदी सरकारने तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन प्रचंड बेफीकीरी दाखवली. त्याचे दुष्परिणाम इतर राज्यांबरोबर महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तबलिगी समाजचा दिल्लीतील कार्यक्रम आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या भूमिकेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते अतिशय गंभीर आहेत त्याची उत्तरे भाजपने द्यावीत, अशा शब्दात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.

हेही वाचा... माझ्यावर प्रेम असेल तर एवढंच करा..! पंतप्रधान मोदींच जनतेला आवाहन

भाजपच्या गेल्या सहा वर्षातील अत्यंत घिसाडघाईच्या व बेफिकीर कारभारामुळे देश पाठीमागे गेला आहे. या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिलेली परवानगी हे अशाच बेफीकीरीचे प्रतिक आहे. असे असतानाही तबलीगचा वापर करून जातीयवाद पसरवण्याचे राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांनी कृपा करून ते करु नका, अशी हात जोडून विनंती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

तबलिगी जमातने महाराष्ट्रातही संमेलन घेण्याबाबत परवानगी मागितली होती. परंतु संभाव्य संकटाची जाण ठेवून महाराष्ट्र पोलिसांनी ती परवानगी नाकारली. त्यामुळे प्रचंड धोका टाळला गेला. परंतु दिल्लीत होणाऱ्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांनी परवानगी तर दिलीच परंतु त्याचदिवशी केंद्र सरकारने पत्रक काढून कोरोना वायरस ही आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणी नाही, असा निर्वाळा दिला होता. इतकेच काय संसद ही अनेक दिवस चालू ठेवून देशातील तमाम नेतृत्वालाही केंद्र सरकारने धोक्यात टाकले होते.

हेही वाचा... सहकारमंत्र्यांच्या 'सह्याद्री' कारखान्यात 'ना नफा, ना तोटा' तत्वावर सॅनिटायझरचे उत्पादन सुरू

दिल्ली पोलिसांना तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाची अधिकृत परवानगी नाकारता आली असती. त्याचबरोबर तिथे किती लोक आहेत, कोण परदेशातून आले याची इत्यंभूत माहिती त्यांना होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तेथे गेले तेव्हा हे स्पष्ट होते. त्यामुळे ही बेफिकीरी जाणीवपूर्वक राजकारण करण्याकरता केली का? हा प्रश्न उपस्थित होतो.

भाजपकडून ज्यापद्धतीने कोरोनाचा विषय हा हिंदू-मुस्लीम अशा पद्धतीचे धृवीकरण करण्यासाठी केला जात आहे. त्यातून ही शंका अधिक गडद होते. खरे तर महाराष्ट्रातील जनतेवरचा धोका अधिक वाढवण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. संपूर्णपणे केंद्र सरकारचा दोष असताना किरीट सोमैय्यांसारखे भाजप नेते राज्यपालांकडे जाऊन, अशा संकटाच्यावेळी राज्यात तबलिगी जमातबद्दल माहिती मागतात. त्यावेळेस कोरोनाबरोबरच समाजात जातीयवादी व्हायरस पसरवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे असे दिसते. आता कोरोनाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतून देश जात असताना तरी जातीयवादाच्या हीन राजकारणाचा भाजपने त्याग करावा, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.