मुंबई - कोरोनाविरोधातील लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा आज मुंबईने यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आज मुंबईतील कूपर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि बीकेसी कोविड केंद्रामध्ये आज लशीची सराव फेरी यशस्वी पार पडली. त्यामुळे आता लस उपलब्ध झाल्यास प्रत्यक्षात लसीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज आहेत, यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. लसीकरणाचा सराव यशस्वी झाल्याने मुंबईकरांना वेध लागले आहेत ते प्रत्यक्षातील लसीकरणाचे. त्यानुसार लवकरच लसीकरणाची तारीख जाहीर होईल आणि सराव फेरीप्रमाणेच लसीकरण यशस्वी करत कोरोनाला आपण हरवू, असा विश्वास यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
मुंबईत कोरोना लसीकरणाचा सराव यशस्वी; वेध प्रत्यक्ष लसीकरणाचे - मुंबईत कोरोना ड्राय रन
आज मुंबईतील कूपर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि बीकेसी कोविड केंद्रामध्ये आज लशीची सराव फेरी यशस्वी पार पडली. त्यामुळे आता लस उपलब्ध झाल्यास प्रत्यक्षात लसीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज आहेत, यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. लसीकरणाचा सराव यशस्वी झाल्याने मुंबईकरांना वेध लागले आहेत ते प्रत्यक्षातील लसीकरणाचे.