मुंबई - कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीपासून देशभरासह मुंबई-महाराष्ट्रातही सुरुवात झाली. पण दुसऱ्या दिवसापासून लसीकरण दोन दिवसांसाठी बंद करावे लागले. काही तांत्रिक अडचणीमुळे हा निर्णय घेण्यात आला. पण आता यातील अडचणी दूर झाल्या असून आजपासून पुन्हा मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार बीकेसी कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर सकाळी 9 वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली. तर आज 500 कोरोना योद्धांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली.
पहिल्या दिवशी 220 जणांना टोचली होती लस
मुंबईत पहिल्या टप्प्यासाठी 9 लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. यात बीकेसी कोविड सेंटर या एकमेव कोविड सेंटरचा समावेश आहे. तर याच सेंटरमध्ये सर्वाधिक 15 युनिटस तयार करण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यापासून येथे जास्तीत जास्त लसीकरण होणार आहे. त्यातही याच लसीकरण केंद्रावरून 16 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला होता. तेव्हा हे केंद्र सर्व दृष्टीने महत्वाचे मानले जाते. तर अशा या केंद्रात पहिल्या दिवशी 200 कोरोना योद्धांना लस देण्यात आली होती. ही लस दिल्यानंतर 3-4 जणांना थोडे गरगरल्यासारखे वाटण्याचा त्रास झाला. पण मोठा कोणताही त्रास वा दुष्परिणाम झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान पहिल्या दिवशी मुंबईतल्या 9 केंद्रावर मिळून 1 हजार 926 कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली. यात सर्वाधिक 289 जणांचे लसीकरण हे राजावाडी रुग्णालयात झाले होते.
15 पैकी 5 युनिटसद्वारे सद्या लसीकरण
बीकेसीमध्ये 15 युनिटस तयार करण्यात आले आहेत. इतर 8 केंद्रावर मात्र 5 ते 10 च्या दरम्यान युनिट्स आहेत. पण सद्या केवळ 5 युनिट्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. कारण पहिल्या टप्प्यात 1 लाख 30 हजार कोरोना योद्धांना लस देण्यात येणार आहे. तेव्हा हे लक्ष्य गाठताना 9 केंद्रातील 72 युनिट्सचा वापर करण्याचे मुंबई महानगर पालिकेने ठरवले आहे. त्यानुसार 5 युनिट्स कार्यान्वित असून आज सकाळपासून पुन्हा लसीकरणाला जोमाने सुरुवात झाली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे.
कोविन अॅपमधील अडचणी दूर
लस घेण्यासाठी कोविन अॅपमध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र याच अॅपमध्ये 16 जानेवारीला काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. नोंदणी करणे कठीण जात होते. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी 17 आणि 18 जानेवारीला लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. आता मात्र सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सकाळी बीकेसी कोविड सेंटर मधील लसीकरण केंद्रात लसीकरण सुरू झाले आहे. आज आमच्याकडे 500 जणांनी नोंदणी केली आहे. आता यातील किती जण आज प्रत्यक्ष येऊन लस घेतात हे सायंकाळी 5 वाजता समजेल असे डॉ. डेरे यांनी सांगितले.
बीकेसी कोविड सेंटरमध्ये पुन्हा लसीकरणाला सुरुवात
बीकेसी कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर आज सकाळी 9 वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली. तर आज 500 कोरोना योद्धांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली.