मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आज शनिवारी 58 हजार 906 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 26 लाख 80 हजार 800 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. दरम्यान लस घेण्यासाठी नागरिकांनी कोविन अॅपवर नोंद केल्यानंतर मोबाईलवर संदेश आला तरच लसीकरणाला यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 58 हजार 906 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 27 हजार 310 लाभार्थ्यांना पहिला तर 31 हजार 613 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 26 लाख 80 हजार 800 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 20 लाख 43 हजार 307 लाभार्थ्यांना पहिला तर 6 लाख 37 हजार 800 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 93 हजार 010 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 46 हजार 578 फ्रंटलाईन वर्कर, 10 लाख 78 हजार 077 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 9 लाख 41 हजार 521 तर 18 ते 44 वर्षामधील 21 हजार 614 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर्संना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. आज 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरणाला गर्दी होत असल्याने कोविन अॅपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,93,010
फ्रंटलाईन वर्कर - 3,46,578
जेष्ठ नागरिक - 10,78,077
45 ते 59 वय - 9,41,521
18 तर 44 वय - 21,614
एकूण - 26,80,800