मुंबई: राज्यात सध्या कोरोना बरा होण्याचा रिकवरी रेट 98.04 टक्के एवढा आहे. तर मृत्यूदर 1.87 टक्के एवढा असून, राज्यात सक्रिय रुग्णाची संख्या 6767 एवढी आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच मुंबईसारख्या शहरातही रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. आज मुंबईमध्ये 961 नवीन रुग्ण सापडले. एकूण रुग्णांपैकी जवळपास साठ टक्के रुग्ण हे केवळ मुंबईत सापडत असल्याने मुंबई चिंता वाढली आहे.
मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये 108 आणि नवी मुंबईमध्ये 99 रुग्ण आढळे आहेत. तर पुण्यात नवीन 63 रुग्ण आढळले. मात्र कोल्हापूर, सांगली सातारा, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, लातूर, उस्मानाबाद, नांदेड इथे एकही रुग्ण सापडला नाही. वाढत्या संसर्गामुळे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही गर्दीच्या ठिकाणी मुंबईकरांनी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा : Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे ९६१ नवे रुग्ण, एका मृत्यूची नोंद