ETV Bharat / city

'त्या' कैद्यामुळे आर्थर रोड कारागृहातील 150 जणांची कोरोना चाचणी

author img

By

Published : May 7, 2020, 10:38 AM IST

आर्थर रोड कारागृहात सध्याच्या घडीला 2000 हुन अधिक कैदी आहेत. या कारागृहातील कैद्यांची मर्यादा 1074 एवढीच आहे. काही आठवड्यापूर्वी याच कारागृहात अधिक कैदी झाल्याने जवळपास 400 कैद्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती.

मुंबई आर्थर रोड कारागृह
आर्थर रोड कारागृह

मुंबई - शहरातील आर्थर रोड कारागृहात 50 वर्षीय कैदी कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्या कैद्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहातील 150 जणांची वैद्यकीय चाचणी जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतली. यात काही जेल कर्मचारी, स्वयंपाकी आणि कैद्यांचा समावेश आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या चाचणीच्या अहवालानंतर कारागृहात कोरोना संक्रमण कुठपर्यंत पोहचले आहे, हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा... अभी तो मैं जवान हूँ ! १०६ वर्षाच्या तरूणाने केली कोरोनावर मात

आर्थर रोड कारागृहातील खुनाच्या गुन्ह्यामध्ये खटला सुरु असलेल्या एका कैद्याला दोन मे रोजी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असता, त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, आर्थर रोड कारागृहातील दोन कर्मचार्‍यांना 27 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांना कारागृहाबाहेर क्वारंटाईन करण्यात आले होते.

आर्थर रोड कारागृहात दरदिवशी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची गाडी, भाजीपाल्याची गाडी ये-जा करत असते. त्याबरोबरच कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेले कस्तुरबा रुग्णालय काही मीटर अंतरावर असल्याने कोरोनाचे संक्रमण आजूबाजूच्या परिसरातूनच झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आर्थर रोड कारागृहात सध्याच्या घडीला 2000 हुन अधिक कैदी आहेत. या कारागृहातील कैद्यांची मर्यादा 1074 एवढीच आहे. काही आठवड्यापूर्वी याच कारागृहात अधिक कैदी झाल्याने जवळपास 400 कैद्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.