मुंबई - राज्यात आणि मुंबईत सातत्याने कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, रुग्ण संख्या वाढत असली तरी, घाबरण्यासारखे परिस्थिती राज्यात तसेच मुंबईत नाही, असं मतं राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ( Nawab Malik on Corona Situation in State ) व्यक्त केले आहे. खासकरून मुंबईमध्ये गुरवारी 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. मात्र, राज्य प्रशासन आणि महानगर पालिका प्रशासनाने उपचारांच्या सर्व व्यवस्था केलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि रुग्णांनी घाबरण्यासारखी परिस्थिती सध्या राज्यात आणि मुंबईत नाही. पण राज्य सरकार तसेच पालिका प्रशासनाने कोरोनाचे जे नियम आखून दिले आहेत. त्याचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम याबाबत जी नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्याचे काटेकोर पालन सर्वांनी केले पाहिजे, असे आवाहन आणि नवाब मलिक यांनी केले आहे.
हेही वाचा - PM Security Breach : पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; भाजपाची काँग्रेसविरोधात देशव्यापी मोहीम