ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढले, आज 939 जणांना लागण - Mumbai Latest Corona News

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभरात 939 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Corona patients increased in Mumbai
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
author img

By

Published : Nov 24, 2020, 10:16 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा रुग्ण संख्या आटोक्यात आली. मात्र आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409पर्यंत खाली आली होती. गेल्या आठवडाभरात त्यात दुप्पटीहून अधिक वाढ झाली आहे. मंगळवारी मुंबईत 939 रुग्ण आढळून आले असून, 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 939 नवे रुग्ण आढळून आले असून, 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 77 हजार 446 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 706 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 404 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 52 हजार 903 वर गेला आहे. सध्या मुंबईत 10 हजार 666 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 218 दिवसांवर -

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 218 दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 396 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 4 हजार 589 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत कोरोनाच्या एकूण 18 लाख 662 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कमी नोंद झालेली रुग्णसंख्या
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.