ETV Bharat / city

दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७८ दिवसांवर - मुंबई कोरोना अपडेट

मार्च महिन्यापासून मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून यायला लागले. मार्चमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 3 दिवस होता.'चेस द व्हायरस', ट्रेसिंग - ट्रॅकींग - टेस्टींग - ट्रिटिंग या चार 'टी' चतु:सूत्रीनुसार सुरू असलेल्या कार्यवाहीमुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७८ दिवसांवर दिवसांवर पोहोचला आहे.

corona patient doubling rate goes 78 days in mumbai
मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७८ दिवसांवर
author img

By

Published : Aug 2, 2020, 10:25 PM IST

मुंबई - मार्च महिन्यापासून मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून यायला लागले. मार्चमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 3 दिवस होता.'चेस द व्हायरस', ट्रेसिंग - ट्रॅकींग - टेस्टींग - ट्रिटिंग या चार 'टी' चतु:सूत्रीनुसार सुरू असलेल्या कार्यवाहीमुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७८ दिवसांवर दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्ण वाढीचा वेग देखील १.७२ टक्क्यांवरुन ०.९० टक्क्यांवर आला आहे.

मिशन झिरो, घरोघरी जाऊन करण्यात येणारी रुग्णांची तपासणी आणि त्याला मुंबईकर नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे सुमारे चार महिन्याच्या कालावधीनंतर मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७८ दिवसांवर पोहोचला आहे.ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याच्या दिवसांमध्ये वाढ सातत्याने नोंदविली जात आहे. २२ मार्च रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा केवळ ३ दिवस होता. जो १५ एप्रिल रोजी ५ दिवस, १२ मे रोजी १० दिवस, २ जून रोजी २० दिवस, १६ जून रोजी ३० दिवस, २४ जून रोजी ४१ दिवस, १० जुलैला ५० दिवस, २८ जुलैला ६९ दिवसांवर, तर १ ऑगस्टला कालावधी ७८ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वांद्रे पूर्व - खार पूर्व - सांताक्रूज पूर्व येथील 'एच पूर्व' विभागात १५५ दिवस एवढा झाला आहे. तर या खालोखाल अंधेरी पश्चिम विभागात १०७ दिवस, भांडुप येथील एस विभाग येथे १०४ दिवस, कुर्ला येथील एल विभाग येथे १०४ दिवस इतका कालावधी आहे.

२४ जून रोजी बृहन्मुंबई महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा किमान कालावधी हा २० दिवस होता. १७ जुलैला हा कालावधी आता किमान २७ दिवसांवर आला होता. १ ऑगस्टला हा कालावधी ४५ दिवसांवर पोहोचला आहे. पालिकेच्या एकूण २४ विभागांपैकी ४ विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शंभरच्या वर असून तो २ विभागात नव्वदच्या वर, ६ विभागात ८० च्या वर, ५ विभागात ७० च्या वर आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दरही २४ पैकी १८ विभागात १ टक्केपेक्षा कमी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.