मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात अनेक ठिकाणी पसरत आहे. मुंबईतदेखील आतापर्यंत 14 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी शासनाने घेतलेली आहे. मात्र, मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणाऱया लोकल रेल्वेच्या गर्दीचा प्रवास तसाच सुरू आहे.
दररोज 75 लाख प्रवासी मुंबईच्या लोकलने प्रवास करत असतात. प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकांमध्ये असते. आतादेखील तशीच गर्दी स्थानकांवर दिसत आहे. कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी तो लगेच पसरू शकतो. त्यामुळे आता रेल्वेमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटातही वाढ केली आहे.