ETV Bharat / city

मुंबईकरांनो काळजी घ्या.. मुंबईत कोरोनाची स्थिती चिंताजनक, वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा

कोरोनानं मुंबईसह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. दिवाळीनंतर कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबईत काही महिन्यांपूर्वी कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली होती. मात्र आता पुन्हा मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी 1,092 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,74,572 झाली आहे. काल 17 रुग्णांचा मृत्यू झाला.

corona condition again critical in mumbai
मुंबईकरांनो काळजी घ्या
author img

By

Published : Nov 22, 2020, 3:08 PM IST

Updated : Nov 22, 2020, 3:19 PM IST

मुंबई - गेला महिनाभर आटोक्यात आलेली मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आता पुन्हा मुंबईकरांना भेडसावत आहे. दिवाळीनिमित्त आनंदोत्सव साजरा करणाऱ्या मुंबईकरांच्या खरेदीच्या व लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरच्या गर्दीत कोरोना पुन्हा जाळे निर्माण करीत असल्याचे आताच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. त्यामुळे डॉक्टर व महापालिका प्रशासन लोकांना आवाहन करत आहेत की, मुंबईकरहो काळजी घ्या.

मुंबईतील सध्या कोरोनाची परिस्थिती हळूहळू वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या जाळ्यात पुन्हा मुंबईकर असे चित्र या काही दिवसात दिसत आहे. आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता तज्ज्ञ सांगत आहेत. गेल्या 24 तासात 1,091 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच 24 तासात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील कोरोनास्थितीबाबत माहिती देताना महापौर व डॉक्टर
अशी वाढली गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्या -
१६ नोव्हेंबर - ४०९१७ नोव्हेंबर - ५४११८ नोव्हेंबर - ८७११९ नोव्हेंबर - ९२४२० नोव्हेंबर - १०३१२१ नोव्हेंबर - १०९२आता सध्या मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 74 हजार 572 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 654 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 1,053 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 51 हजार 509 वर गेला आहे. सध्या मुंबईत 9 हजार 325 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईकरांनी काळजी घेतली तर नक्कीच फरक पडेल - डॉक्टर
जगभरातील कोरोना विषाणूचा आढावा घेतला तर तज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मुंबईत एकीकडे महापालिका कोरोनाशी लढण्यात यशस्वी ठरत आहे असं म्हणत असतानाच मुंबईची कोरोनाची आकडेवारी काही औरच सांगते. त्यात दिवाळी सण म्हणजे लोकांची गर्दी ही असणारच. दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली, लोक एकत्र आली, आनंद उत्सव साजरा झाला, सगळीकडे तेजोमय वातावरण झाले परंतु याच दिवाळीत कोरोनाने आपले जाळे पुन्हा एकदा पसरवले हे मात्र खरे ! आटोक्यात येत असलेला कोरोना आता पुन्हा हातबाहेर जाऊ लागला आहे. दिवाळी निमित्ताने बाजारात लोकांची झुंबड उडालेली आपण पाहिली यामुळे कोरोनाची संख्या वाढली असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. तसेच लोकांनी प्रशासनाने दिलेले नियम पाळले व काळजी घेतली तर नक्कीच परिस्थिती सुधारेल, असे डॉक्टर पूनम कांबळे यांनी सांगितले.
पालिका सज्ज आहे, पण लोकांनी वाटेल तसं वागू नये, काळजी घ्या - महापौर
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांनी दिवाळीत विनाकारण गर्दी करू नये तसेच सुरक्षित राहून दिवाळी साजरी करावी असं आव्हान मुख्यमंत्री व पालिकेने केलं होतं. मुंबईत दिवाळीत लोकांची गर्दी आटोक्यात यावी यासाठी पालिकेने अनेक प्रयत्न देखील केले. मात्र लोकांनी गर्दी केलीच, पण जरी दिवाळी नंतर कोरोना वाढत असला तरी पालिकेची कोरोनाला दोन हात करण्यासाठी पालिका संपूर्ण सज्ज आहे ,लोकांनी वाटेल तसं वागू नये , नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

Last Updated : Nov 22, 2020, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.