ETV Bharat / city

#कोरोना लॉकडाऊन : आम्ही कधी सुधारणार...? - सोशल डिस्टिन्सिंग

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सुमारे साडेसातशेच्या पार गेली आहे. तर देशातही 4 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 45 तर देशात एकूण 109 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच हजारोंच्या संख्येने लोकांना रुग्णालये अथवा स्वतःच्या घरात क्वारंटाईन केले आहे.

भारत लॉकडाऊन
भारत लॉकडाऊन
author img

By

Published : Apr 6, 2020, 5:12 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत चालला आहे. परदेशातून आलेले कोरोनाबाधित यांच्याबरोबर आता परदेशात न गेलेल्या लोकांच्याही चाचण्या पॉझिटीव्ह येत आहेत. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने अशा प्रकारे कोरोनाचा देशात आणि राज्यात प्रसार होत शकतो. त्यामुळे वाढती कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर काळजी घेणे गरजेचे आहे. असे असतानाही देशातील जनता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याचे दिसत आहे. राज्यातही काही विशेष परिस्थिती असल्याचे दिसत नाही. लॉकडाऊन आणि संचारबंदीतही लोक रस्त्यावर अनावश्यक गर्दी करताना दिसत आहेत.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सुमारे साडेसातशेच्या पार गेली आहे. तर देशातही 4 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 45 तर देशात एकूण 109 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच हजारोंच्या संख्येने लोकांना रुग्णालये अथवा स्वतःच्या घरात क्वारंटाईन केले आहे.

हेही वाचा... कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समुदाय सहभाग महत्वाचा

कोरोना विषाणू ही जागतिक महामारी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर करण्यात आले आहे. चीन, इटली, स्पेन, अमेरिका, फ्रान्स यांसारख्या बड्या राष्ट्रांत कोरोनाने धुमाकुळ घातला. त्यामुळे भारत सरकार आणि विविध राज्य सरकारे यांनी वेळीच सर्व पाऊले उचलली. कोरोनाला रोखण्यासाठी हर एक उपाययोजना केल्या. नागरिकांना सातत्याने सुचना आणि प्रशासकीय नियोजन केले. जमावबंदी, संचारबंदी अखेरीस 21 दिवसांचा लॉकडाऊन देखील करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचा देशात शिरकाव झाला आणि वेगाने आता तो देशभर पसरत आहे. देशात जे एकूण कोरोनाग्रस्त आहेत त्यात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. यामुळे महाराष्ट्र शासनाकडून सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. मात्र, असे असतानाही एकूण जनतेला किंवा नागरिकांच्या काही गटला अजून या महामारीचे गांभीर्य समजल्याचे दिसत नाही.

कोरोना हा विषाणू आहे. त्याची वैशिष्ट्ये पाहता इतर कोणत्याही विषाणूपेक्षा तो सर्वाधिक घातक ठरतो आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात लढण्यासाठी शासनाप्रमाणेच जनतेची देखील प्रामाणिक साथ असने आवश्यक आहे. जनतेच्या एका गटाने किंवा काही घटकाने जर याबाबत समंजसपणा दाखलवला नाही, तर त्याचा तोटा हा मात्र सर्वांनाच होणार आहे. त्यामुळे अपवादात्मक लोकांच्या चुकीच्या वागण्याचे तोटे सर्वांच्याच वाट्याला येऊ शकतात. कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव पाहता लोकांना मात्र अद्याप ही बाब समजून आलेली दिसत नाही. यामुळेच लॉकडाऊन, संचार बंदी आणि जमावबंदीचे राज्यात सर्वच ठिकाणी उल्लंघन होताना दिसत आहे. तसेच पंतप्रधानांच्या सोशल डिस्टिन्सिंग या आवाहनाला देखील लोक हरताळ फासत असल्याचे दिसत आहे.

पुढील काही उदाहरणे ही लोकांना कोरोनाचे गांभीर्य न समजल्याचेच द्योतक मानाले लागेल...

मुंबई - वांद्रे पश्चिम येथील एच(पश्चिम) येथे अनधिकृतरित्या बाजार भरत आहे. तसेच या ठिकाणी विक्रते लॉकडाऊनचा फायदा उठवत अधिक नफ्याने कृषीमालाची विक्री करत आहेत. एकुणच कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना या अधिक लोकसंख्येच्या शहरात लाॅकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी - राजीवडा भागात रविवारी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यामुळे हा भाग कंटेंटमेंट आणि बफर झोन जाहिर केला होता. पण असे असतानाही राजीवडा खाडी किनारी भागात मासेमारी केली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, नागरिक सरकारकडून देण्यात आलेल्या सुचनांवा गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे.

सातारा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना पंतप्रधानांनी सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन केले आहे. मात्र, लोक याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथे लोक अद्यापही मॉर्निंग वॉक करताना आढळत आहेत. लातूरात देखील असाच प्रकार काही दिवसांपूर्वी आढळला होता.

हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली प्रशासनाने नागरिकांना वेळीच सर्व सुचना दिल्या होत्या. तसेच वारंवार माहिती देखील दिली जात आहे. असे असतानाही लोक राजरोजपणे परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता वाहने घेऊन रस्त्यावर मिरवत आहे. अखेर लोकांना समजावण्यासाठी आणि कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्षात रस्त्यावर उतरावे लागले आहे.

सोलापूर - कोरोना ही वैश्विक महामारी आहे. त्याविरोधात भारतातील जनतेची एकजूट दाखवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनीटे दिवे लावायला सांगितले होते. मात्र सोलापूरकरांनी या दिवे लावण्यासोबतच फाटकेही वाजवले. या फटाक्यांची ठिणगी विमानतळाजवळ पडली त्यामुळे विमानतळ परिसराला आग लागली. असाच धक्कादायक प्रकार चंद्रपूर येतही घडला आहे. चिमूर तालुक्यात एका गावात दिवे लावताना घरच पेटल्याचे समोर आले. एकूणच लोकांना सुचनांचे गांभीर्य लक्षात येत नसल्याचे दिसत आहे.

आज संपुर्ण जग कोरोनासोबत लढत आहे. कोविड -19 bj (कोरोना व्हायरस) उपचार आणि लस शोधण्याचे जोरदार प्रयत्न संशोधकांकडून सुरू आहेत. मात्र या दरम्यान कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाला रोखण्यासाठी सामाजिक हस्तक्षेप होणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांची मानसिकता आणि वर्तनात बदल होणे आवश्यक आहे. कोरोनासारख्या शत्रुसोबत लढण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाय म्हणून जनजागृतीसोबत समुदायाचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. मात्र, आपल्या इथे काही प्रमाणात याच्या उलट होताना दिसत आहे. देशात आता एकूण 109 बळी गेले आहेत. राज्यातही हा आकडा पन्नास पर्यंत झेपावत आहे. असे असताना लोकांनी वेळीच सावध न झाल्यास आपल्या नुकसानीस आपणच जबाबदार असणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.