ETV Bharat / city

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाला कोरोनाचा फटका; गाळे क्वारंटाइन सेंटरसाठी राखीव

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 880 रहिवाशांची पात्रता निश्चित झाली आहे. पण या रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया मात्र थांबली आहे. कोरोनामुळे शिबिरातील 1816 गाळे सद्या मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना आणखी वेळ थांबावे लागणार आहे.

बीडीडी चाळ पुनर्विकास बातम्या
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाला कोरोनाचा फटका; गाळे क्वारंटाइन सेंटरसाठी राखीव
author img

By

Published : Dec 8, 2020, 5:17 PM IST

मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 880 रहिवाशांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली आहे. पण या रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया मात्र थांबली आहे. कोरोनामुळे शिबिरातील 1816 गाळे सद्या मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात आहेत. सर्व गाळ्यांचा वापर क्वारंटाइन सेंटर म्हणून केला जात आहे. त्याचवेळी हे गाळे 31 डिसेंबरपर्यंत परत देता येणार नाही, असे पालिकेने म्हाडाला कळवले आहे. त्यामुळे हे गाळे ताब्यात मिळण्यास आणि त्याचे वितरण करण्यास विलंब होणार आहे. परिणामी वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला याचा फटका बसला आहे.

बीडीडी चाळ पुनर्विकास बातम्या
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाला कोरोनाचा फटका; गाळे क्वारंटाइन सेंटरसाठी राखीव

पात्रता निश्चितीला वेग

वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम टाटा हाऊसिंगला देण्यात आले आहे. दरम्यान या प्रकल्पाअंतर्गत आधी पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवण्यात येणार आहे. मग चाळी पाडून त्यावर बांधकाम करण्यात येणार आहे. त्यानुसार आतापर्यंत 1120 रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्यात आली आहे. तर पुढील पात्रता निश्चितीचे काम वेगात सुरू आहे. 1120 रहिवाशांपैकी 880 रहिवाशांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली आहे, अशी माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.

'या' रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यासाठी अडचण

नियमानुसार पात्र रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवण्यात येणार आहे. त्यासाठी 'श्रीनिवास मिल' आणि 'बॉम्बे डाईंग मिल'मधील 1816 गाळे राखीव ठेवण्यात आले आहेत. पण या गाळ्यात 880 रहिवाशांना स्थलांतरीत करता येत नसल्याचे चित्र आहे. कारण ही 1816 गाळे पालिकेने क्वारंटाइन सेंटर साठी ताब्यात घेतले आहेत. मार्चपासून ही घरं ताब्यात घेतली आहेत. पण अद्याप ही घरं मुंबई मंडळाला परत मिळत नसल्याचे चित्र आहे. हे गाळे परत द्यावे, यासाठी म्हाडाच्या उपाध्यक्षांनी, अनिल डिग्गीकर यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहिले होते. हे पत्र लिहून दोन महिने उलटले, तरी 1816 गाळे परत मिळाले नसल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.

आता नव्या वर्षातच गाळे परत मिळणार?

म्हाडा उपाध्यक्षांनी ऑक्टोबरमध्ये पालिका आयुक्तांना पत्र लिहून गाळे परत मागितले होते. यावर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आयुक्तांनी उत्तर पाठवले आहे. त्यानुसार त्यांनी गाळे 31 डिसेंबरपर्यंत परत करता येणार नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. सध्या मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास मोठ्या संख्येने क्वारंटाइन, आयसोलेशनसाठी जागेची गरज पडणार आहे. त्यामुळे आता तरी हे गाळे परत करू शकणार नसल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता 2021 मध्येच हे गाळे म्हाडाला मिळण्याची शक्यता आहे. तर याचा परिमाण आता वरळीच्या कामावर होताना दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.