मुंबई - बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आणि रेल्वे तिकीट (Railway Ticket) खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने स्थानकाबाहेर जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक (जेटीबीएस) सुविधा सुरु केली आहे. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे जेटीबीएस केंद्र बंद असल्याने साडे तीनशे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. जेटीबीएस सेवक (Jan Sadharan Ticket Booking Sewak) आपली कैफियत मांडण्यासाठी आज मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवारांकडे गेले होते. मात्र, त्यांची काही ऐकून न घेता मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून त्यांना परत पाठवले असल्याची माहिती अखिल भारतीय जेटीबीएस. संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली आहे.
- आम्ही उपाशी मारायचं का?
कोरोना संसर्ग वाढू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाने मागील दोन वर्षे आमच्या उपजीविकेचे साधन असलेल्या खासगी जेटीबीएस केंद्र बंद ठेवले आहेत. मात्र, याचा विपरीत परिणाम झाला आहे. लसीकरण वाढ व सर्व सरकारी तसेच खासगी आस्थापनातील कर्मचारी उपस्थितीत झालेली वाढ, तसेच अन्य रेल्वे प्रवाशांची वाढलेली संख्या यामुळे सर्वच उपनगरीय रेल्वे स्थानकावर तिकीटे व पास घेण्यासाठी प्रवासी प्रचंड गर्दी करीत आहेत. ही गर्दी कोरोनाचा संसर्ग वाढण्यास निश्चितच धोकादायक ठरत आहे.
मार्चपासून शासनाने विविध सार्वजनीक प्रवासावरील निर्बंध शिथिल केले आहे. वाढत्या संभाव्य "गर्दीचे नियोजन व विभाजन केले पाहिजे. या वाढणाऱ्या गर्दीच्या विभाजनासाठी निर्बंध शिथिल करण्यापुर्वीच रेल्वे तिकीटे देणाऱ्या जेटीबीएस केंद्र सुरू होणे गरजेचे आहे.मात्र, रेल्वेचा नकारतेपणामुळे गेल्या दीड वर्षांपासून जेटीबीएस केंद्र बंद पडली आहे. त्यामुळे मुंबई -उपनगरातील साडे तीनशे पेक्षा जास्त कुटूंबियांवर उपासमारी आली आहे.
- आम्हाला न्याय मिळणार का?
अखिल भारतीय जेटीबीएस. संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, प्रवाशांना तिकीट खिडकीवर गर्दी लक्षात घेता रेल्वेने अनारक्षित तिकीट विक्रीकरिता जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक (जेटीबीएस) नियुक्त केली आहे. सद्या परिस्थितीमध्य आणि पश्चिम रेल्वेवर जनसाधारण तिकीट बुकिंग ३५० पेक्षा जास्त सेवक कार्यरत आहे. कोरोनामुळे दिर्घकाळ जेटीबीएस केंद्र बंद असल्यामुळे कुटुंबियांची उपासमार होत आहे. त्यामुळे रेल्वेने जनसाधारण तिकीट बुकिंग सेवकांना तिकीट विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणीचे निवेदन मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवारांकडे गेलो होतो. मात्र, मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळच आम्हाला थांबवले. थेतून हुसकावून लावले आहे. येणाऱ्या काही दिवसात जनसाधारण टिकट बुकिंग सेवकांना न्याय मिळाला नाही. तर सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देशमुख यांनी दिला.