ETV Bharat / city

वांद्र्याच्या एमटीएनएल इमारतीत अद्यापही कुलिंग ऑपरेशन सुरू - bandra west

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एमटीएनएल इमारतीला सोमवारी आग लागली होती. या आगीत अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र, या इमारतीमध्ये आज (मंगळवारी) दुसऱ्या दिवशीही कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एमटीएनएल इमारतीला सोमवारी आग लागली होती.
author img

By

Published : Jul 23, 2019, 7:43 PM IST

मुंबई - वांद्रे पश्चिम येथील एमटीएनएल इमारतीला सोमवारी आग लागली होती. या आगीत अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र, या इमारतीमध्ये आज दुसऱ्या दिवशीही कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. हे कुलिंग ऑपरेशन मंगळवारी रात्रीपर्यंत चालेल असे सांगण्यात आले आहे. या इमारतीमधील टेलिफोन एक्स्चेंज जळाल्याने विभागातील टेलिफोन सेवा सुरू करायला बराच कालावधी लागणार असल्याचे समजते.

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एमटीएनएल इमारतीला सोमवारी आग लागली होती.

पश्चिम उपनगरातील वांद्रे पश्चिम येथे एस व्ही रोडवर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एमटीएनएलचे कार्यालय असलेली दहा माजली इमारत आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून परिसरात लँड लाइन, लीज लाइन, ब्रॉडबँड सेवा पुरविली जाते. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर सोमवारी आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवत आगीत अडकलेल्या ९० ते १०० लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे.

एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांनी आगीमध्ये अडकलेल्या सर्वांना बाहेर काढल्याचे सांगितले असले तरी शोध मोहीम आजही सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच आगीनंतर करण्यात येणारे कुलिंग ऑपरेशन आज मंगळवारीही सुरू आहे. मंगळवारी इमारतीत काळोख, सर्वत्र पाणी व जळाल्याचा कुबट वास पसरलेला होता. भिंती आगीमुळे गरम झाल्या असून त्यामधून उष्ण हवा बाहेर पडत असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

या आगीमध्ये इमारतीमधील ऑफिस कॅबिन, ऑफिस रेकॉर्ड, फर्निचर, सर्व्हर रूम, युपीएस बॅटऱ्या, इलेकट्रीक वायरिंग, दरवाजे खिडक्या, खुर्च्या, टेबल कॉम्प्युटर आदी साहित्य जळाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीमुळे एमटीएनएल प्रणालीचे मोठे नुकसान झाले असून, या परिसरातील सुमारे ३२ हजारांपेक्षा अधिक जोडण्यांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे समजते. टेलिफोनच्या केबलना आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे वांद्रे पश्चिम विभागातील एमटीएनएलच्या सर्व जोडण्या बंद झाल्या आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असला तरी नेमके कारण चौकशीनंतरच कळेल असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

Intro:मुंबई
वांद्रे पश्चिम येथील एमटीएनएल इमारतीला काल आग लागली. या आगीत अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र या इमारतीमध्ये आज दुसऱ्या दिवशीही कुलिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. हे कुलिंग ऑपरेशन मंगळवारी रात्री पर्यंत चालेल असे सांगण्यात आले आहे. या इमारतीमधील टेलिफोन एक्स्चेंज जळाल्याने विभागातील टेलिफोन सेवा सुरु करायला बराच कालावधी लागणार असल्याचे समजते. Body:पश्चिम उपनगरातील वांद्रे पश्चिम येथे एस व्ही रोडवर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एमटीएनएलचे कार्यालय असलेली दहा माजली इमारत आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून परिसरात लँड लाइन, लीज लाइन, ब्रॉडबँड सेवा पुरविली जाते. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर सोमवारी आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवत आगीत अडकलेल्या ९० ते १०० लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांनी आगीमध्ये अडकलेल्या सर्वाना बाहेर काढल्याचे सांगितले असले तरी शोध मोहीम आजही सुरु असल्याचे सांगण्यात आले. तसेच आगीनंतर करण्यात येणारे कुलिंग ऑपरेशन आज मंगळवारीही सुरु आहे. मंगळवारी इमारतीत काळोख, सर्वत्र पाणी व जळाल्याचा कुबट वास पसरलेला होता. भिंती आगीमुळे गरम झाल्या असून त्यामधून उष्ण हवा बाहेर पडत असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

या आगीमध्ये इमारतीमधील ऑफिस कॅबिन, ऑफिस रेकॉर्ड, फर्निचर, सर्व्हर रूम, युपीएस बॅटऱ्या, इलेकट्रीक वायरिंग, दरवाजे खिडक्या, खुर्च्या, टेबल कॉम्प्युटर आदी साहित्य जाळल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीमुळे एमटीएनएल प्रणालीचे मोठे नुकसान झाले असून, या परिसरातील सुमारे ३२ हजारांपेक्षा अधिक जोडण्यांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे समजते. टेलिफोनच्या केबलना आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे वांद्रे पश्चिम विभागातील एमटीएनएलच्या सर्व जोडण्या बंद झाल्या आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असला तरी नेमके कारण चौकशीनंतरच कळेल असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.