ETV Bharat / city

द्रौपदी मुर्मूविषयी वादग्रस्त टिपण्णी; रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात भाजपची महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार - Ramgopal Varma Controversial

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल अपमानास्पद टिपण्णी ( Controversial Remarks About Draupadi ) समाज माध्यमांवर केल्याबद्दल मुंबईतील भाजप कार्यकर्ते सुभाष राजोरा ( BJP activist Subhash Rajora ) यांनी बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयात ( Bandra Municipal Magistrates Court ) राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रामगोपाल वर्मा वादाच्या भवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

Ramgopal Varma
रामगोपाल वर्मा
author img

By

Published : Jul 17, 2022, 12:05 PM IST

मुंबई - राम गोपाल वर्मा यांनी 22 जून रोजी एनडीए आणि विशेषत भाजप पुरस्कृत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी ( Controversial Remarks About Draupadi ) केली होती. त्यानंतर देशभरातील भाजपच्या नेत्यांकडून राम गोपाळ वर्मांविरोधात कारवाई मागणी करण्यात आली होती. वर्मा यांची समाज माध्यमांवरील टिपण्णी ही महिलांचा अपमान करणारी आहे. तसेच अनुसूचित जाती एससी लोकांचा अनादर करणारी आहे असा दावा सुभाष राजोरा ( BJP activist Subhash Rajora ) यांनी तक्रारीत केला आहे.

मुंबईतील भाजपचे कार्यकर्ते सुभाष राजोरा यांनी वर्मांविरोधात कलम 499, 500, 504, 506 भारतीय दंड संहिता अंतर्गत कारवाईची करण्याची तक्रार महानगर दंडाधिकारी ( Bandra Municipal Magistrates Court ) यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत न्याय दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी 11 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत.

द्रौपदी मुर्मू यांना विक्रमी मतदान मिळण्यासाठी गोव्यात राजकीय हालचाली - गोव्यातील सर्व आमदार व खासदार तसेच विरोधकांनीही आपल्या उमेदवाराला सपोर्ट करावा अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant )यांनी केली आहे. एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ( NDA presidential candidate Draupadi Murmu ) गोव्यात ( Draupadi Murmu In Goa ) 14 जुलै रोजी दाखल झाले होते. गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी भाजप व सहयोगी गटाच्या आमदारांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे . मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे, राज शिष्टाचार व वाहतूक मंत्री म्हवहिन गुदिनो, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक ( Union state Minister Shripad Naik ) यांच्यासोबत भाजपचे सर्व आमदार खासदार व सहयोगी गटाचे आमदारही या बैठकीला उपस्थित होते. ( meeting with BJP MPs and MLAs ).

यापूर्वी राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या विरुद्ध २४ मे २०२२ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल ( cheating case against ram gopal verma ) करण्यात आला होता. शेखर आर्ट्स क्रिएशनचे मालक कोप्पाडा शेखर राजू यांनी पोलिसात वर्मा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.'आशा एन्काउंटर' हा रंगोपाल वर्मा दिग्दर्शित चित्रपट आहे. 2019 मध्ये हैदराबादच्या उपनगरात घडलेल्या एका हत्येवर आधारीत हा चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. मात्र, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी वर्मा यांनी आपल्याकडून पैसे घेतले, असा आरोप कोप्पाडा शेखर राजू यांनी केला आहे. शेखर म्हणाले की, वर्मा यांनी 2020 मध्ये 8 लाख, 20 लाख, आणि नंतर 28 लाख रुपये असे तीन टप्प्यात घेतले. आशा एन्काउंटर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पैसे परत करणार असे आश्वासन वर्मा यांनी दिले होते. मात्र, नंतर वर्मा हे आशा चित्रपटाचे निर्माते नसल्याचे कळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे शेखर म्हणाले होते.

हेही वाचा : Draupadi Murmu In Goa : राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची गोव्यात भाजपच्या आमदार खासदारांसोबत बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.