मुंबई - आरेमध्ये होणारे मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गला हलवण्यामागे खासगी मालकाला फायदा पोहचवण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी हा आरोप केला असून राज्य सरकारने कांजुरमार्ग येथे कारशेड हलवण्यासंदर्भात कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रात ही जागा खासगी मालकाची असेल तर त्यांना मोबदला दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले असल्याचा आशिष शेलार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. खासगी मालकांना नफा पोहचवण्यासाठीच मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. तसेच खासगी मालकांना अशा प्रकारे जागेचा मोबदला राज्य सरकारला 50 हजार कोटी चुकवावे लागतील, अशी भीती व्यक्त केली.
कांजूरमार्गला कारशेड नेल्याने चार वर्षे उशीर - फडणवीस
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कांजूरमार्गला कारशेड नेल्याने चार वर्षे उशीर होणार आल्याचा आरोप विधानसभेत केला आहे. कांजूरमार्गला सर्व मेट्रो एकच मोठं कारशेड बनवलं तर खर्चाचा भुर्दंड राज्य सरकारला बसेल. या सोबतच जवळपास चार वर्ष उशीर हा मेट्रो कार शेड बनवण्यासाठी होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना चार वर्ष अजून वाट पाहावी लागेल, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना दिलं होतं.
मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यामागे खासगी मालकाला फायदा पोहचवण्याचे षडयंत्र - आशिष शेलार
आरेमध्ये होणारे मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गला हलवण्यामागे खासगी मालकाला फायदा पोहचवण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे.