मुंबई : मुंबईतील लघु न्यायालयाने सीसीआयला मोठा दिलासा दिला आहे. सीसीआयने रुस्तम कंपनीला दिलेली जागा पुढील दोन महिन्यांत परत देण्याचे निर्देश लघु न्यायालयाने दिल्याने सीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील चर्चगेट येथील 80 वर्षांहून अधिक जुने रुस्तम अँड कंपनी आईस्क्रीम पार्लर रिकामे करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (CCI) च्या आवारात हे दुकान आहे. हे प्रकरण जवळपास 26 वर्षे न्यायालयात होते. ( The outcome of a case pending for 26 years)
लघु न्यायालयाचा रुस्तम कंपनीला दणका : लघु न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, ब्रेबॉर्न स्टेडियम येथील नॉर्थ स्टँड बिल्डिंगच्या तळमजल्यावर सुमारे 3070 चौरस फुटांचे हे दुकान असून, 950 चौरस फुटांचा मजलाही आहे. कोर्टाने 30 एप्रिलला यावर दोन्ही पक्षकारांना युक्तिवाद पूर्ण झाला होता, आज लघु न्यायालयाने या संदर्भात निकाल दिला आहे. तसेच, रुस्तम कंपनीला दुकानाचा ताबा शांतपणे क्लबकडे सोपवण्याबाबत निर्णय दिला आहे.
न्यायालयाकडून दोन्ही बाजूंची तपासणी : सीसीआयने 1996 मध्ये रुस्तमला बाहेर काढण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. ज्यांना त्यांनी क्लब सुविधांच्या विस्तारासाठी 1939 मध्ये आईस्क्रीम पार्लर चालवण्यासाठी जागा दिली होती. CCI ला त्यांच्या कामकाजासाठी या दुकानाची आवश्यकता आहे की नाही आणि या निर्णयाचा सर्वाधिक त्रास कोणाला होईल असे दोन मुद्दे कोर्टाने लक्षात घेतले. न्यायाधीश एस. बी. तोडकर यांनी सीसीआयच्या बाजूने निर्णय दिला. रुस्तमला बाहेर काढल्यास नुकसान होणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सीसीआयची न्यायालयात धाव : के. रुस्तम अँड कंपनी, चर्चगेट आईस्क्रीम पार्लर, आईस्क्रीम बनवण्यासाठी आणि विकण्यासाठी भाड्याने घेतलेल्या चार गाळ्यांपैकी फक्त एक वापरत होते, असे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) ने आपल्या दाव्यात म्हटले होते. दुसरीकडे, सभासदांची संख्या वाढत असताना, CCI ला त्याचे कॉफी शॉप, पूलसाइड ग्लान्स, क्रीडा आणि मनोरंजनात्मक कारणांसाठी जागेची गरज होती. CCI ने रुस्तम कंपनीला 1939 मध्ये आईस्क्रीम पार्लर चालवण्यास 9 गाळे भाड्याने दिले होते. मात्र, जागेची गरज असल्याने CCI 1996 मध्ये याप्रकरणी कोर्टात धाव घेतली, आता 2022 मध्ये या प्रकरणाचा निकाल आला आहे.
हेही वाचा : मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे मुंबई पोलिसांची कोट्यवधींची थकबाकी