ETV Bharat / city

Nana Patole Criticized Narendra Modi : 'शरम करो मोदी'! पंतप्रधानांच्या निषेधार्थ राज्यभरात कॉंग्रेस उद्यापासून रस्त्यावर उतरणार : नाना पटोले

author img

By

Published : Feb 8, 2022, 3:57 PM IST

लोकसभा आणि राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या ( PM Modi Attack On Congress ) होत्या. त्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिल ( Nana Patole Criticized Narendra Modi ) आहे. पंतप्रधान मोदींवर यावेळी सडकून टीका करताना, शरम करो मोदी असे फलक घेऊन राज्यभर निषेध मोर्चा काढणार असल्याचे पटोले यांनी ( Congress Going To Protest Against PM Modi ) म्हणाले.

'शरम करो मोदी'! पंतप्रधानांच्या निषेर्धात राज्यभरात कॉंग्रेस उद्यापासून रस्त्यावर उतरणार : नाना पटोले

मुंबई - कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या मजुरांमुळे प्रसार वाढला, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत ( PM Modi Attack On Congress ) केला. महाराष्ट्र काँग्रेसने यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंतप्रधानांच्या विधानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. मोदींनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ( Nana Patole Criticized Narendra Modi ) केली. पंतप्रधान मोदींवर यावेळी सडकून टीका करताना, शरम करो मोदी असे फलक घेऊन राज्यभर निषेध मोर्चा काढणार असल्याचे पटोले यांनी ( Congress Going To Protest Against PM Modi ) म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्राला अपमानित करण्याचं काम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत महाराष्ट्रातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांमुळे कोरोनाचा संसर्ग पसरला असल्याचा दावा केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राने देशाला अनेक वर्षे दिशा दाखवली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. भाजपने जाहीर माफी मागितली पाहिजे. पंतप्रधानांनीसुद्धा माफी मागितली पाहिजे, ज्या महाराष्ट्राने देशाला खूप काही दिले आहे. ज्या महाराष्ट्राने प्रत्येक राज्याला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. गुजरातमध्ये भूकंप आला तर त्यासाठी सर्वात जास्त मदत या महाराष्ट्राने केली आहे. ज्या मुंबईने धीरुबाई अंबानी, गौतम अदानी असतील यांना श्रीमंत करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. अभिनेते होण्यासाठी आलेल्या लोकांना मोठं करण्याचे काम ज्या महाराष्ट्राने केले त्या महाराष्ट्राला अपमानित करण्याचे काम केल्याचा आरोप पटोले यांनी केला.

पंतप्रधान की भाजपचे प्रचारक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लोकसभेत आणि राज्यसभेत झाले. खर तर पंतप्रधान हे देशाचे आहेत. परंतु, भाजपच्या प्रचारकाची भूमिका ते निभावत आहेत. राजकीय व्यवस्थेमध्ये देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेले व्यक्ती स्वतःला अजूनही भाजपचे प्रचारक म्हणून वागत असतील तर त्या पदाची गरीमा संपल्यात जमा आहे. भाजपला ते योग्य वाटत असेल तर ठीक आहे. मात्र, कॉंग्रेस हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा पटोले यांनी दिला. भाजपवर यावेळी पटोले यांनी सडकून टीका केली.

उद्यापासून राज्यभर आंदोलन

महाराष्ट्राच्या भाजपच्या लोकांनी स्पष्ट केले पाहिजे. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. उद्यापासून महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करणार आहोत. निषेधाची फलक घेऊन उभे राहणार आहोत. महाराष्ट्राच्या अपमानाचा निषेध करण्याची भूमिका घेणार असून हे आम्ही सहन करणार नाही असे नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी देखील सोबत यावे, असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.