मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सध्या शिवसेना ( Nana Patole on shiv sena rajya sabha candidate ) आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात चर्चा सुरू असली तरी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार ( Shiv sena rajya sabha candidate ) देईल त्याला काँग्रेसकडूनही पाठिंबा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केल आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या विषयी काँग्रेसला देखील आदर आहे. मात्र, यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा असून, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला होता. मात्र, पुढच्या वेळेस काँग्रेसच्या उमेदवाराला ( Rajya sabha Election congress support ) तो अधिकार असेल असे संकेतही नाना पटोले यांनी आज दिले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आज दादर येथील टिळक भवन कार्यालयात पार पडत असून यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
हेही वाचा - संभाजी राजे भूमिकेवर ठाम, शिवसेना प्रवेशाची ऑफर नाकारली, राज्यसभेची चुरस वाढली
कोणाला उमेदवारी द्यायची हा शिवसेनेचा अधिकार - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोणाला उमेदवार करायचे हा शिवसेनेचा अधिकार आहे. मात्र, उमेदवार ठरवत असताना शिवसेनेने काँग्रेसची भूमिका जाणून घ्यावी. तसेच, छत्रपती संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत शिवसेनेने निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र, शिवसेना जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केल.
ओबीसीच्या आरक्षण प्रकरणात ॲडव्होकेट जनरलच्या चुका - राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. मात्र, या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित व्हाव्यात यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. याआधीही ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण लागू व्हावे यासाठी राज्य सरकारकडून कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या होत्या. मात्र, या कायदेशीर तरतुदी करताना राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांनी चुका केल्या असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.