ETV Bharat / city

दिल्लीत आज नाना पटोले-राहुल गांधींची भेट; काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना मिळणार डच्चू ? - नाना पटोले घेणार राहुल गांधींची भेट

काँग्रेसचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, क्रीडामंत्री सुनील केदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेट घेत आहेत. आजही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पटोले हे दोन मंत्र्यांचे राजिनामे घेण्यावर थेट चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Congress State President Nana Patole
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Jul 20, 2021, 1:39 PM IST

मुंबई - सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत हालचालींना मोठा वेग आला आहे. आळीपाळीने काँग्रेस मंत्री दिल्ली दरबारी हजेरी लावत आहेत. दोन अकार्यक्षम मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असून, याच पार्श्वभूमीवर आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे कोणत्या दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

काँग्रेसच्या कोणत्या दोन मंत्र्यांना मिळणार डच्चू

गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, क्रीडामंत्री सुनील केदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेट घेत आहेत. दिल्लीतील पक्षश्रेष्ठी दोन मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असून त्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याबाबत दिल्लीत हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राहुल गांधी यांच्याशी थेट चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील दोन मंत्र्यांना डच्चू मिळेल आणि त्या जागी काँग्रेसचे दोन नवीन चेहरे मंत्रिमंडळात सामील होतील अशी चर्चा आहे.

विधानसभा अध्यक्षपदाबाबत काय होणार चर्चा ?

महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपदावरुन कलगीतुरा रंगत आहे. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला आहे, मात्र शिवसनेना नेते भास्कर जाधव यांनी आपण विधानसभा अध्यक्ष होण्यास तयार असल्याचे वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आज नाना पटोले दिल्लीत राहुल गांधी यांच्यासोबत विधानसभा अध्यक्षपदाबाबत देखील चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या वाढत्या सावटामुळे पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेता आली नव्हती. मात्र आता लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्यात यावा यासाठी राहुल गांधी यांच्याकडे नाना पटोले गळ घालणार आहेत.

नाना पटोले यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

दोन मंत्र्यांचे राजीनामे झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे एका मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाना पटोले हे राहुल गांधी यांच्या मर्जीतले नेते आहेत. विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राहुल गांधी यांच्या मर्जीनुसार नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे यापुढे नाना पटोले यांना मंत्रिमंडळातही स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.