मुंबई - कोरोनाची भयंकर परिस्थिती राज्यात निर्माण झालेली असताना भाजपकडून आज करण्यात येत असलेल्या आंदोलनावर राज्यभरात #महाराष्ट्रद्रोहीBJP हा ट्रेंड जोरात सुरू आहे. अशातच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करून भाजपला महाराष्ट्रद्रोही असे म्हटले आहे.
सावंत यांनी यासाठी एक बारा ओळीची कविता केली असून त्या कवितेत त्यांनी ' मरो जनता हवी सत्ता, #महाराष्ट्रद्रोहीBJP नाव तयांचे,' असे म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला मदत करण्याऐवजी भाजपकडून सरकारविरोधात आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका करत ही कविता केली आहे.
सचिन सावंत यांनी केलेली ही कविता -
-
कोरोनाच्या भयानक संकटात
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सुचतं कसं राजकारण?
काळे कपडे घालून म्हणती
अंगणाचे करू रणांगण
शत्रू कोरोना समस्त मानवतेचा
भयंकर अन् मायावी
डॉक्टर,नर्स,पोलिस,प्रशासन
जीवाची बाजी लावी
वाढवती न धैर्य योद्ध्यांचे
समरातही निषेधाचे सूर जयांचे
मरो जनता हवी सत्ता#महाराष्ट्रद्रोहीBJP नाव तयांचे
">कोरोनाच्या भयानक संकटात
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 22, 2020
सुचतं कसं राजकारण?
काळे कपडे घालून म्हणती
अंगणाचे करू रणांगण
शत्रू कोरोना समस्त मानवतेचा
भयंकर अन् मायावी
डॉक्टर,नर्स,पोलिस,प्रशासन
जीवाची बाजी लावी
वाढवती न धैर्य योद्ध्यांचे
समरातही निषेधाचे सूर जयांचे
मरो जनता हवी सत्ता#महाराष्ट्रद्रोहीBJP नाव तयांचेकोरोनाच्या भयानक संकटात
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 22, 2020
सुचतं कसं राजकारण?
काळे कपडे घालून म्हणती
अंगणाचे करू रणांगण
शत्रू कोरोना समस्त मानवतेचा
भयंकर अन् मायावी
डॉक्टर,नर्स,पोलिस,प्रशासन
जीवाची बाजी लावी
वाढवती न धैर्य योद्ध्यांचे
समरातही निषेधाचे सूर जयांचे
मरो जनता हवी सत्ता#महाराष्ट्रद्रोहीBJP नाव तयांचे
राज्यात आज कोरोना शत्रूशी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, प्रशासन, सरकार लढत असताना भाजप नेते या लढ्यात सहभागाऐवजी सरकारशी लढत आहेत जे दुर्दैव असल्याचे सावंत यांनी म्हटले होते. तसेच पूर परिस्थितीच्या काळात बेदरकारपणे वागलेल्या नेत्यांना पाहूनही आम्ही त्यावेळी आंदोलन केले नव्हते, याची त्यांनी भाजप नेत्यांना आठवण करून दिली आहे.