ETV Bharat / city

मुंबई महापालिकेच्या सर्व जागा लढवण्यासाठी काँग्रेस तयार - भाई जगताप

काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ जागा लढवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

भाई जगताप
भाई जगताप
author img

By

Published : Dec 25, 2020, 7:45 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीने एकत्रित पणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवाव्यात, अशी मागणी आघाडीतील पक्षांकडून केली जात आहे. त्याचवेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ जागा लढवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. यापुर्वी देखील त्यांनी असे वक्तव्य केले होते. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर जगताप यांनी आज दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीतळाला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर जगताप बोलत होते. यावेळी बोलताना बाळासाहेब यांच्या सर्व स्मृतिदिनाला मी नेहमी येतो, राजकारणाच्या पलिकडे काही व्यक्तींचं स्थान असतं, इथे प्रेरणा मिळते, आज आणि उद्या सर्व महान व्यक्तींच्या प्रेरणा स्थळावर जाणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.

कॉंग्रेस निवडणुकीबाबत तळ्यात-मळ्यात

यापुर्वी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा देण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. या निवडणुकीबाबत आमची बैठकही झाल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी सुद्धा दिले आहेत. मात्र कॉंग्रेस सुध्दा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. त्यामुळे कॉंग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या कॉंग्रेस निवडणुकीबाबत तळ्यात-मळ्यात असल्याचे चित्र आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणूकी संदर्भात बैठक घेऊन निर्णय-

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाल्यानंतर निर्णय प्रक्रीयेसाठी त्यांना प्रदेश काँग्रेसवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना पद देऊन त्यांचे पंख छाटल्याची चर्चा होत आहे. मात्र यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी समन्वयासाठी हीच जुनी पद्धत असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच मुंबई महापालिकेच्या सर्व जागा लढवण्याची आपली तयारी असल्याचे काँग्रेसचे नूतन मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले. यावर आमची औपचारिक बैठक होईल, त्यानंतर याबाबतीत निर्णय होईल, असे चव्हाण म्हणाले होते.

फडणवीसांनी हवाई पाहणी केली -

यावेळी बोलताना भाई जगताप यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. आज शेतकरी आंदोलनाचा २९ वा दिवस आहे. आतापर्यंत २५ पेक्षा अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना शेतकऱ्यांचा संप झाला. राज्यात पूर आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी केवळ हवाई पाहणी केली. त्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे वाटप झाले नाही, असा आरोप भाई जगताप यांनी केला. विमा कंपन्या केंद्र सरकारने ठरवल्या असल्याने त्याबाबत त्यांनी बोलू नये. फडणवीस यांची केविलवाणी स्थिती झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी जाहीर केले. त्यातील साडेसात कोटी रुपये वर्ग झाल्याचा दावा भाई जगताप यांनी केला.

फडणवीस यांनी तेढ निर्माण करू नये -

मराठा आरक्षणाबाबत बोलताना, हा भावनिक आणि गुंतागुंतीचा विषय आहे. आरक्षण देण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुरोगामी महाराष्ट्रातील समाजात या मुद्द्यावरुन तेढ निर्माण करु नये, असे जगताप यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- आता अंगुठा छाप नव्हे तर सातवी पास सरपंच; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.