ETV Bharat / city

'भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका' पुस्तकातून काँग्रेसची मोदींवर टीका - शिशुपाल

मोदींच्या पापांचा घडा भरला असल्याने देशातील जनता मोदींना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाली आहे, अशी भूमिका काँग्रेसने 'भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका' या पुस्तकातून मांडली आहे.

मोदी पुस्तक
author img

By

Published : Mar 31, 2019, 10:15 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या १०० चुकांचे पुस्तक काँग्रेसने प्रसिद्ध करत मोदींसोबत भाजपवर निशाणा साधला आहे. महाभारतातील श्रीकृष्णाच्या भूमिकेत येऊन काँग्रेसने मोदीला शिशुपाल म्हणत त्यांच्या १०० चुका आता पूर्ण झाल्या असल्याचे दाखवले आहे. मोदींच्या पापांचा घडा भरला असल्याने देशातील जनता मोदींना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाली आहे, अशी भूमिका काँग्रेसने 'भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका' या पुस्तकातून मांडली आहे.

'भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका' या पुस्तकाचे काँग्रेसकडून प्रकाशन

काँग्रेसने पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. पुस्तकातील तब्बल ९० पेक्षा जास्त पानावर मोदींच्या चुका दाखवण्यात आल्या आहेत. उर्वरित पानांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या या पुस्तिकेमध्ये सुरुवातीला मोदींच्या 'राफेल सौदा अंबानीचा फायदा' असे हेडिंग देऊन राफेलच्या घोटाळ्यावर लक्ष वेधले आहे. नोटाबंदीने देशातील लाखो रोजगार उद्ध्वस्त केले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाभाडे काढले, त्या नोटाबंदीपासून तर जीएसटी विमा कंपन्या आणि मोदींनी जाहीर केलेल्या अनेक योजनांवर मोदींच्या चुकांवर लक्ष वेधण्यात आले आहे.

देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य आधी विषयांसोबतच नियोजन आयोगाने घातलेल्या गोंधळावर बोट ठेवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या काळात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर करण्यात आलेल्या बदनामीची दखल घेण्यात आली आहे. 'नेहरूंच्या बदनामीचा ध्यास मांडला खोटा इतिहास' असे हेडिंग देऊन मोदींना एका कार्टूनच्या माध्यमातून उभे करून आता नेहरू यांच्याबद्दलचा चुकीचा प्रचार भारतीय जनता सहन करणार नाही असा इशाराही यातून देण्यात आला आहे. मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवर 'लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण' अशी टीका करण्यात आली आहे.

'झोपी गेला चौकीदार, मोदी चोक्सी झाले फरार' अशी एक हेडिंग देऊन काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे 'मल्याला केले बाय-बाय नक्की बोलणं झालं काय' हे प्रकरण देऊन भाजप आणि मोदींना काँग्रेसने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. एकीकडे यूजीसी सारखी संस्था मोदी सरकार गुंडाळत असतानाच दुसरीकडे मात्र श्रीमंत वर्गासाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा करते असे हे या पुस्तकातून दाखवून देण्यात आले आहे.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून १३ कोटी वृक्षारोपणाचा जो आव आणला गेला त्यात झालेल्या भ्रष्टाचारावर काँग्रेसने या पुस्तिकेत बोट ठेवले आहे. ही कोट्यावधीची रोपटे नेमकी गेली कुठे, असा सवाल केला आहे. तर, दुसरीकडे 'अवनीचे मारेकरी आणि पर्यावरणाचा जप करी' असे प्रकरण देऊन मुनगंटीवार पुन्हा धारेवर धरले आहे. पुस्तिकेचा शेवट संभाजी भिडे यांच्या प्रकरणाने करण्यात आला असून मोदी त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन वाचवता येत असे एक कार्टून दाखवण्यात आले आहे.

Intro:भाजपच्या 'शिशुपाल' मोदींच्या 'चुकांचा घडा' काँग्रेसने पुस्तिकेतून साधला निशाणा

Body:भाजपच्या 'शिशुपाल' मोदींच्या 'चुकांचा घडा' काँग्रेसने पुस्तिकेतून साधला मोदींवर निशाणा

मुंबई, ता. 30 :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या 100 चुकांचा घडा काँग्रेसने आज एका पुस्तिकेच्या माध्यमातून प्रसिद्ध करून मोदीं सोबतच भाजपवर निशाणा साधला आहे. महाभारतातील श्रीकृष्णाच्या भूमिकेत येऊन काँग्रेसने मोदीला शिशुपाल म्हणत त्यांच्या शंभर चुका आता पूर्ण झाल्या असल्याचे दाखवले आहे. मोदींच्या पापांचा हा शंभर चुकांचा घडा भरला असल्याने देशातील जनता मोदींना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाली आहे, अशी भूमिका काँग्रेसने केलेल्या 'भाजपचा शिशुपाल मोदींच्या शंभर चुका' या पुस्तिकेतून मांडली आहे.

काँग्रेसने या पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले असून त्यावर एक दोन नव्हे तर तब्बल 90 हून अधिक पाने खर्च केली आहेत. उर्वरित पानांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही अचूकपणे निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या या पुस्तिकेमध्ये सुरुवातीला मोदींच्या 'राफेल सौदा अंबानीचा फायदा' असे हेडिंग देऊन राफेलच्या घोटाळ्यावर लक्ष वेधले आहे. नोटाबंदीने देशातील लाखो रोजगार उद्ध्वस्त केले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाभाडे काढले, त्या नोटाबंदी पासून तर जीएसटी विमा कंपन्या आणि मोदींनी जाहीर केलेल्या अनेक योजनांवर अत्यंत समर्पकपणे मोदींच्या चुकांवर लक्ष वेधण्यात आले आहे.

देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य आधी विषयांसोबतच नियोजन आयोगाने घातलेल्या गोंधळावर बोट ठेवण्यात आले आहे. मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर आणि त्यासंदर्भातील भूमिकेवरही काँग्रेसने अत्यंत समर्पकपणे चुकांची मांडणी केली आहे. मोदी सरकारच्या काळात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर करण्यात आलेल्या बदनामीची दखल घेण्यात आली आहे. 'नेहरूंच्या बदनामीचा ध्यास मांडला खोटा इतिहास' असे हेडिंग देऊन मोदींना एका कार्टूनच्या माध्यमातून उभे करून आता नेहरू यांच्याबद्दलचा चुकीचा प्रचार भारतीय जनता कदापि सहन करणार नाही असा इशाराही यातून देण्यात आला आहे. त्यासोबत मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवर ही एका प्रकरणात 'लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण' असे हेडिंग देऊन मोदींवर टीका केली आहे. त्यांच्या अनेक भाषणांचा हवाला देत त्यांचे अज्ञान ही यातून उघड करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

आपले पितळ उघडे पडेल म्हणून मोदी यांनी वेळोवेळी माध्यमांच्या समोर न येता मौन व्यक्त केलेले आहे त्यावरही काँग्रेसच्या या पुस्तिकेत मोदींवर एका कार्टून च्या माध्यमातून चांगलीच खिल्ली उडवण्यात आली आहे. मोदी जर विकासाच्या इतक्या बाता मारतात तर ते पत्रकारांसमोर का जात नाहीत असा सवाल यातून विचारण्यात आला आहे. मोदींच्या सोशल मीडियावरील बोगस फॉलोवर्सवरची चूकही या पुस्तिकेत दाखवण्यात आली आहे.
मोदींकडून करण्यात आलेल्या हवेतल्या घोषणा तसेच मोदींना इतर नेत्यांबद्दल वाटणारी असुरक्षितता इतकी टोकाची आहे की आपल्याला आव्हान देणारे कोणीच खपत नाही त्यामुळे त्यांनी अनेक आपल्या वरिष्ठांना कसे डावलले हे लालकृष्ण आडवाणी यांना दाखवून काँग्रेसने मोदींवर तिर मारला आहे.

रुपयांची घसरण, जीडीपीचा वाढवलेला आकार आणि त्यासोबतच मोदी भांडवलदाराचे तारणहार कसे आहेत त्यावरही काँग्रेसने यावर बोट ठेवले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या पुत्रांच्या संपत्तीची ही दखल या पुस्तिकेत घेण्यात आली आहे. त्यासाठी काँग्रेसने सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या जमीन व्यवहारावरून भाजपाकडून करण्यात येणाऱ्या खोट्या आरोपांची राळ उठवली जाते मात्र अमित शहा यांचे पुत्र जय यांच्या वाढलेल्या संपत्तीवर मात्र ही मंडळी चौकशी करण्याऐवजी विचारणाऱ्याना कसे धमकावते हेही या पुस्तकातून दाखवून देण्यात आले आहे.
'झोपी गेला चौकीदार, मोदी चोक्सी झाले फरार' अशी एक हेडिंग देऊन काँग्रेसने मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे 'मल्याला केले बाय-बाय नक्की बोलणं झालं काय' हे प्रकरण देऊन भाजप आणि मोदींना काँग्रेसने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. एकीकडे यूजीसी सारखी संस्था मोदी सरकार गुंडाळत असतानाच दुसरीकडे मात्र श्रीमंत वर्गासाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा करते असे हे या पुस्तकातून दाखवून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या पुस्तिकेतून सुटलेले नाहीत. हे
गुंतवणुकीचे कसे खोटे आकडे सादर करून विकास झाल्याचा आव आणतात त्यावर या पुस्तिकेत बोट ठेवण्यात आले आहे. जलयुक्त शिवारात आणि पाण्याची झालेला भ्रष्टाचार या प्रकरणात काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे तर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून 13 कोटी वृक्षारोपणाचा जो आव आणला गेला त्यात झालेल्या भ्रष्टाचारावर काँग्रेसने या पुस्तिकेत बोट ठेवले आहे. ही कोट्यावधीची रोपटे नेमकी गेली कुठे, असा सवाल केला आहे तर दुसरीकडे 'अवनीचे मारेकरी आणि पर्यावरणाचा जप करी' असे प्रकरण देऊन मुनगंटीवार पुन्हा धारेवर धरले आहे. पुस्तिकेचा शेवट संभाजी भिडे यांच्या प्रकरणाने करण्यात आला असून मोदी त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन वाचवता येत असे एक कार्टून दाखवण्यात आले आहे.

काँग्रेसने तयार केलेल्या पुस्तकांची रचना अत्यंत साधी आणि सहज समजेल अशा स्वरूपाची आहे. प्रत्येक पानावर एक विषय घेऊन त्याला काव्यमय हेडींग देण्यात आलेले आहे. उत्तम सादरीकरण करण्यात आले असून पहिल्या पानापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत वेगवेगळ्या कार्टून च्या माध्यमातून काँग्रेसने अत्यंत समर्पकपणे या पुस्तकाची मांडणी केली आहे. यामुळे येत्या काळात हे पुस्तक बरेच चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

Conclusion:भाजपच्या 'शिशुपाल' मोदींच्या 'चुकांचा घडा' काँग्रेसने पुस्तिकेतून साधला मोदींवर निशाणा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.