ETV Bharat / city

बाबांचे आशिर्वाद नेहमीच सोबत म्हणूनच इथपर्यंत पोहोचलो - अमित देशमुख

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करणार आहे. ते नक्कीच चांगल्या प्रकारे काम करेल, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

Amit deshmukh
अमित देशमुख
author img

By

Published : Dec 30, 2019, 7:41 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज सोमवारी मुंबईत विधिमंडळ परिसरात पार पडला. यावेळी काँग्रेसकडून स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली, आपण वडील विलासरावांच्याच आशिर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलो आहोत. यापुढेही त्यांच्याच मार्गावर काम करू, असे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

आमदार अमित देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया...

अमित देशमुख यांनी मानले लातूरकरांचे आभार

पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दाखवलेला विश्वास आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेली संधी याबाबत आभारी आहोत, असे अमित देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच ज्या लातूरकरांनी तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास दाखवला. आपल्याला निवडून दिले, त्या लातूरच्या मतदारांचेही देशमुख यांनी आभार मानले आहेत.

सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करेल...

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर काम करणार आहे. आणि ते नक्कीच चांगले काम करेल, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला. देशात NRC, CAA यांमुळे तरूणाईत असंतोष आहे. याबाबत आघाडीच्या सरकारने आपली भुमिका सभागृहात स्पष्ट केली आहे. त्याबाबत सविस्तर भुमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांसारखे नेते स्पष्ट करतील, असेही अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... मंत्रीपदाच्या काळात एकही मिनिट वाया न घालवता जनतेची कामे करणार - यशोमती ठाकूर

स्वर्गीय विलासराव यांचे स्मरण नेहमीच होते - अमित देशमुख

अमित देशमुख यांना त्यांचे वडील व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या बाबत विचारले असता, त्यांचे आपल्याला नेहमीच स्मरण होते. त्यांचा आशिर्वाद नेहमीच सोबत आहे. त्यामुळेच इथपर्यंत पोहचू शकलो. त्यांचेच नाव आणि कार्य पुढे ठेवण्याचे माझे काम आपण करणार आहोत. तसेच जनतेच्या आशिर्वादाने ते काम पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा... येडीयुरप्पांच्या 'त्या' विधानाला ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटलांनी दिले उत्तर, म्हणाले...

विजयाची हॅट्ट्रीकनंतर अमित देशमुख यांना दुसऱ्यांदा मंत्रीपद

अमित देशमुख यांना राज्यात काँग्रेस पक्षातील तरुण नेतृत्व म्हणून पाहिले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार देशमुख यांनी विजयाची हॅट्ट्रीक साधली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात देशमुख यांची वर्णी लागणार, हे निश्‍चित मानले जात होते. अखेर आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. लातूरचे देशमुख घराणे हे, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून गेली तीस-चाळीस वर्षे सातत्याने राजकारणात राहिले आहे. विलासराव देशमुख यांनी राज्यात दोन वेळा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी संभाळली. त्यानंतर त्यांचा राजकीय वारसा, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आमदार अमित देशमुख आणि यावर्षी आमदार बनलेले धिरज देशमुख हे समर्थपणे पुढे नेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.