ETV Bharat / city

KCR Maharashtra Visit : केसीआर यांच्या उद्धव ठाकरे, शरद पवार भेटीवर काँग्रेस नाराज, यशोमती ठाकूर म्हणाल्या...

author img

By

Published : Feb 20, 2022, 10:21 PM IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ( Telangana CM KCR ) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) आणि शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ( Congress Reaction On Uddhav Thakeray KCR Meeting ) तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचा पर्याय अशक्यच असल्याचा दावा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ( Yashomati Thakur On KCR Sharad Pawar Meeting ) ठाकूर यांनी केला आहे.

Yashomati Thakur On KCR Sharad Pawar Meeting

मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ( Telangana CM KCR ) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) आणि शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ( Congress Reaction On Uddhav Thakeray KCR Meeting ) तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस शिवाय विरोधी पक्षांच्या आघाडीचा पर्याय अशक्यच असल्याचा दावा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ( Yashomati Thakur On KCR Sharad Pawar Meeting ) ठाकूर यांनी केला आहे.

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर -

ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज मुंबईत येऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी काँग्रेसला चर्चेसाठी बोलावले नाही. यामुळे त्यांच्या मनात काय आहे ते स्पष्ट होते. अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्यावतीने नाराजी व्यक्त केली. तसेच काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊ शकत नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

महाविकासआघाडी म्हणून का चर्चा नाही -

केसीआर यांनी शिवसेनेच्या नेत्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशीही चर्चा केली. मात्र, या चर्चेत काँग्रेसचा उल्लेख करण्यात आला नाही. केसीआर यांनीही उल्लेख टाळला इतकच काय महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही काँग्रेसचा उल्लेख टाळला. याबाबत ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी भाजपाला विरोध या एका मुद्द्यावर एकत्र आलेली आहे. असे असतानाही काँग्रेसला डावलण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील सद्य स्थितीचे वातावरण पाहता काँग्रेस शिवाय विरोधकांची आघाडी कधीच मजबूत होऊ शकत नाही आणि आकारायलाही येऊ शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा- KCR Meet Sharad Pawar : बेरोजगारी, विकास, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समविचारी पक्षांचा एकत्र येण्याचा विचार : शरद पवार

हेही वाचा- KCR-Uddhav Thackeray PC : उद्धव ठाकरे म्हणाले, आमचे हिंदूत्व बदल्याच्या राजकारणाचे नाही, तर केसीआर म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.