ETV Bharat / city

केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेची घोर निराशा तर मुंबई मनपाचा अर्थसंकल्प हा फुगीर- भाई जगताप - Budget 2022

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प व मुंबई महानगरपालिकेमध्ये सादर झालेला अर्थसंकल्प हे दोन्ही अर्थसंकल्पावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी टीका केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प फसवा व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करणारा असून मुंबई अर्थसंकल्प वाढीव व फुगीर करून दाखवण्यात असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

BHAI JAGTAP
मुंबई मनपाचा अर्थसंकल्प हा फुगीर- भाई जगताप
author img

By

Published : Feb 4, 2022, 10:11 PM IST

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Minister of Finance of India Nirmala Sitharaman ) यांनी सादर केलेला अर्थसंकल्प व मुंबई महानगरपालिकेमध्ये सादर झालेला अर्थसंकल्प हे दोन्ही अर्थसंकल्पावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Mumbai Congress President Bhai Jagtap) यांनी टीका केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प फसवा व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करणारा असून मुंबई अर्थसंकल्प वाढीव व फुगीर करून दाखवण्यात असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

भाई जगताप म्हणाले, की शेतकऱ्यांनी केंद्राच्या तीन काळ्या कायद्यांविरोधात ३७० दिवस आंदोलन केले गेले त्याचा साधा उल्लेख सुद्धा नाही, त्या आंदोलनात ज्यांना आपला जीव गमवावा लागला त्यांना काहीही मदत केली नाही. देशातील ८३ टक्के नागरिकांची परिस्थिती खालावली आहे. मग हे सरकार कुणासाठी काम करत आहे. कंपन्या विकण्याचं काम सुरू आहे व त्या अदानी, अंबानी विकत घेत आहेत. या अर्थसंकल्पात कुठल्याच वर्गाला दिलासा दिला नाही. पण कॉर्पोरेट टॅक्स कमी केला. आम्हाला अपेक्षा होती तो वाढेल पण तो कमी केला. कामगारांची पूर्णतः वाट लागली आहे. देशात १३ टक्के संघटीत असलेला कामगार आता ७ टक्के झाला आहे. कोविड साठी काहीही उपाययोजना नाही. गेल्या बजेट मध्ये कोविड साठी ठेवलेला निधी गेला कुठे? असा प्रश्नही या प्रसंगी भाई जगताप यांनी उपस्थित केला.

अर्थमंत्र्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला
उत्तर भारतीय लोकांचा अपमान करणार वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. सभागृहात बोलताना त्यांनी राहुल गांधी हे उत्तर भारतीय सारखे स्टाईल करतात, असे म्हटले होते. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यावर मुंबईतील उत्तर भारतीय जनता नक्कीच याचा हिशोब घेईल, असे भाई जगताप म्हणाले. अर्थसंकल्पात ४०० वंदे भारत ट्रेन सुरु करणार असे त्यांनी सांगितले आहे. पण या येणार कुठून? ते सांगितले नाही. हे सरकार फक्त ठराविक श्रीमंत लोकांसाठी आहे. असेही भाई जगताप म्हणाले.

मुंबई महानगर पालिकेचा ४५,९४९.२१ कोटींचा अर्थसंकल्प वाढीव व फुगीर
मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प हा फुगीर अर्थसंकल्प आहे. यंदा हे बजेट ७ हजार कोटीने वाढले आहे. विशेष व राखीव निधी मधून गेल्यावर्षी २७ टक्के काढले होते. या वेळेला ३२ टक्के वाढवण्यात आले. बरीच कामे अजून झालेली नाही आहेत. आरोग्य व शिक्षण महत्त्वाचे आहे. मराठी शाळांची अवस्था फार वाईट आहे. शाळा दुरुस्ती साठी ५०० कोटी खर्च करण्यापेक्षा नवीन शाळा बांधाव्यात. ५०० चौरस फूट पर्यंत मालमत्ता कर १ एप्रिल २०२२ पासून माफ करण्यात आला आहे पण ही कर माफी २०१९ पासून करायला हवी होती.असे भाई जगताप यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.