ETV Bharat / city

मराठा आरक्षणाबाबत विरोधकांची उचलली जीभ अन् लावली टाळ्याला, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल - काँग्रेस नेते अशोक चव्हाण

विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, या प्रकरणाबाबत विरोधी पक्षाकडून मराठा समाजाची दिशाभूल सुरू आहे. समाजाला वस्तुस्थितीशी विसंगत व विपर्यास करणारी तसेच धादांत खोटी माहिती दिली जाते आहे.

ashok-chavan
अशोक चव्हाणां
author img

By

Published : Dec 14, 2020, 7:02 PM IST

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावर विरोधी पक्षातले अनेक नेते बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत. या मुद्यावर त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. त्यांच्या हाताला सध्या काहीच काम नाही. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

विरोधकांकडे सध्या विषयच नाहीत - चव्हाण

अशोक चव्हाण म्हणाले, की विरोधकांकडे सध्या काही विषयच उरलेले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे त्यांना अजिबात वाटत नाही. असे गलिच्छ राजकारण विरोधकांकडून सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उचलली जीभ लावली टाळ्याला अशी भूमिका विरोधकांची राहिलेली आहे, असा घणघात अशोक चव्हाण यांनी केला.

..तेव्हा फडणवीस चुकले का -

चव्हाण म्हणाले की, फडणवीस तेव्हा म्हणाले होते, न्यायालयात टिकेल असे आरक्षण आम्ही देऊ, मग तेव्हा फडणवीस चुकले का? केवळ राजकारणासाठी सर्व विषयाचा वापर करायचा एवढेच चालले आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. न्यायालयात बाजू मांडण्याचे काम शेवटी वकिलांचे असते. त्यामुळे सरकार अपयशी ठरले, असे जे म्हणतात ते अप्रत्यक्षपणे सरकारच्या वकिलांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे वकील हे फडणवीस सरकारच्या काळात नेमले गेले होते. ते अपयशी ठरले असे म्हणायचे असेल तर मग फडणवीस सरकारने अक्षम वकील नेमले असे म्हणायचे का? पण आम्ही तसे राजकीय आरोप करणार नाही. कारण वस्तुस्थिती तशी नाही. सरकारच्या वकिलांनी अतिशय उत्तमपणे बाजू मांडली आहे.

असेही चव्हाण यावेळी म्हणाले. तसेच मंत्र्यांचे बंगले ही खासगी प्रॉपर्टी नाही, त्यामुळे दर पाच, दोन वर्षांनी बंगल्यावर असा खर्च होत असतो, असेही स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिली.

पण महाविकास आघाडीचे सरकार मराठा समाजासोबत असून, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही कायम रहावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.