मुंबई - काँग्रेसने आत्तापर्यंत तीन उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. आज (शुक्रवार) अर्ज भरण्याची अंतिम मुदत असताना काँग्रेसने सकाळपर्यंत तब्बल चार उमेदवार बदलले आणि त्यांच्या ठिकाणी दुसरे उमेदवार दिले आहेत.
हेही वाचा - विधानसभेच्या मैदानातून खडसेंची माघार, रोहिणी खडसेंना सहकार्य करण्याचे आवाहन
नाशिक येथून शाहू खैर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या ठिकाणी काँग्रेसने आपला उमेदवार बदलून डॉ. हेमलता पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे कोकणातील कुडाळ येथून हेमंत कुडाळकर यांची उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी चेन मोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. नंदुरबार येथून मोहन पवनसिंग यांची उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी उदयसिंग पाडवी आणि सिल्लोड येथून प्रभाकर पालोदकर यांच्या ठिकाणी कैसर सय्यद यांना उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा -उमेदवारी न मिळणं अनपेक्षीत, आत्मपरिक्षण करणार - विनोद तावडे
काँग्रेसने शेवटची पाचवी यादी शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आली. काँग्रेसने या निवडणुकीत एकूण १४६ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यात काँग्रेसने पहिल्या यादीत ५१, दुसऱ्या यादीत ५२ आणि तिसऱ्या यादीत १९ आणि त्यानंतर २० आणि आज ५ अशा एकूण पाच उमेदवारी यादीत एकूण १४६ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यातच आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनाही साकोली या विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे.