मुंबई - कर्नाटकमधील 11 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला. त्यातील 10 आमदार मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. या आमदारांसोबत आम्हाला बोलू आणि भेटू द्या, असे म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल बाहेर निदर्शने केली. त्यामुळे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हॉटेल बाहेर कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, पुन्हा काही वेळानंतर काँग्रेसच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांनी हॉटेल बाहेर निदर्शने सुरू केली. यावेळी तेथे काँग्रेस नेते भाई जगताप, एकनाथ गायकवाड आणि बाबा सिद्दिकी उपस्थित होते. भाजपचे नेते या ठिकाणी येतात आमदारांना भेटतात पण आम्हाला त्यांना भेटता येत नाही, असे का? ही भाजपची खेळी आहे. आम्हाला पण या आमदारांना भेटू द्या, आम्ही त्यांची समजूत काढायला आलो आहोत, असे सांगत कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला.