मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने देश सर्व जाती धर्म लिंग पंथ या भेदभावाच्या पलीकडे जाऊन एकत्र येत असल्याचा आपण पाहत आहोत जनता आपापल्या घरात घराबाहेर राष्ट्रध्वजाला नमन करत त्याला अभिवादन करत समतेचा विचार घेत एकमेकांना भेटत आहे मात्र त्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील अध्यापक महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या समोर आहे त्या ठिकाणी बीएडच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राचार्यांनी भेदभावाची वागणूक दिल्या संदर्भातली तक्रार आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे दिली गेली आहे
तपास अधिकाऱ्यांकडे प्रकरण चौकशी देशाचे भविष्य शाळेमध्ये घडते आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवतात जे शिक्षक होणार आहेत असे विद्यार्थी अध्यापक महाविद्यालयामध्ये मुंबईमध्ये शिकत आहेत शासनाचा अध्यापक महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ आहे त्या ठिकाणी मुंबई ठाणे रायगड पालघर आणि आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी विद्यार्थी शिक्षक होण्यासाठीच शिक्षण घेत आहे या अध्यापक विद्यालयांमध्ये मुली देखील आहे मुलं देखील आहे त्यांचे एकत्र शिक्षण होत आहे मुलांनी आजार मैदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी मध्ये नमूद केला आहे की आमच्या प्राचार्य उर्मिला मॅडम सातत्याने आदिवासी म्हणून हिणवतात मुली जर बाथरूमला जाताना स्कार्फ काढून खुंटीला टांगतात त्यावेळेला अत्यंत अश्लील शेरेबाजी करतात तुम्ही आदिवासी लोक तुम्हाला याचा उच्चार व्यवस्थित जमत नाही तुम्ही तसेच राहणार अशा पद्धतीची हीन वागणूक मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केलेला आहे
कायद्यानुसार उचित कारवाई होईल यासंदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी ईटीव्ही भारतने बातचीत केली असता ते म्हणाले विद्यार्थ्यांनी तक्रार दिली असेल तर पहातो आणि या संदर्भात काय पुढील कार्यवाही असेल तर ती आम्ही नक्कीच करू परंतु विद्यार्थ्यांचे म्हणणं असेल की तात्काळ ॲट्रॉसिटी लावा तर आम्हाला नेमकं पहावा लागणार चौकशी करावा लागणार आणि मग त्या संदर्भातली पुढील कारवाई आम्ही करू असे त्यांनी नमूद केले तसेच तपास अधिकारी पूनम जाधव याचा तपास करून एफ आय आर नोंदवतील कायद्यानुसार उचित कारवाई होईल असे आश्वासन आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना सांगितले
प्राचार्या आमच्यासोबत अमानवी रीतीने व्यवहार करतात मुंबई मंडळ एक चे डीसीपी बालाजी यांच्यासोबत ईटीव्ही भारतच्या वतीने संपर्क केला असता या घटनेबद्दल मी बैठकीत असल्यामुळे आता काही बोलू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आदिवासी मुलींपैकी विद्यार्थी असलेली अक्षदा माळेकर हिने ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितलं की आमच्या शरीराकडे बघून आमच्या रंगाकडे बघून आणि आमच्या उच्चाराकडे बघून आमच्या प्राचार्या जरी महिला असल्या तरी अत्यंत घाणेरड्या पातळीवर शेरेबाजी करतात आणि आम्हाला इथे सांगायलाही लाज वाटते इतक्या खालच्या स्तरावर जाऊन त्या आमच्या सोबत भेदभावची वागणूक करतात या प्राचार्यांवरच महाराष्ट्र शासनाने निलंबनाची कारवाई देखील केलेली आहे तरी देखील या प्राचार्य आमच्याशी कोणत्यातरी पूर्वग्रह दूषित आणि आकर्षाने वागत आहेत त्यामुळे ते आमच्याशी भेदभाव करतात आणि हे राज्यघटनेच्या मूल्यांची पायमल्ली करणारं असल्याचं विद्यार्थ्यांनी ईटीव्ही भारतला सांगितले
प्राचार्या उर्मिला परळीकर यांचा दावा तर या संदर्भात संबंधित अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य उर्मिला परळीकर मॅडम यांच्याशी ईटीवी भारतने संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की विद्यार्थी वेळेवर येत नाही विद्यार्थ्यांची हजेरी कमी असते आम्ही त्यांना समजून घेतो एखाद्या विद्यार्थिनीची तब्येत ठीक नसते तरी आम्ही त्यांना समजून घेतो परंतु विद्यार्थी जे सांगत आहे ती फक्त त्यांचीच बाजू सांगत आहेत विद्यार्थी खोटं बोलत आहे पण असं विद्यार्थ्यांच्या सोबत अशी वर्तणूक केली नाही मात्र विद्यार्थ्यांनी प्रचार्य यांचा दावा खोदून काढत आम्हाला केवळंचे उच्चार चुकतात म्हणून भेदभावाची वागणूक देणे किती उचित आमची गैरहजेरी असेल म्हणून काय आमच्या सोबत अमानवी वागणं करण्याचा अधिकार यांना आहे का स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी हि असमानता आम्ही मान्य करत नाही आम्हाला न्याय मिळायला हवा असे त्यांचे म्हणणे त्यांनी ईटीव्ही सोबत मत व्यक्त करताना मांडले या मुंबईच्या अध्यापक महाविद्यालयात सुमारे ४० विद्यार्थी शिकत आहेत ते या प्रकाराने भयभीत झाले आहेत
हेही वाचा - Funeral for Mete जनसमुदायाकडून जड अंतकरणाने विनायक मेटेंना अखेरचा निरोप