ETV Bharat / city

'कोरोनाचे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दोन समित्यांची नियुक्ती; तर, मुंबईसाठी स्वतंत्र समिती'

कोरोनामुळे राज्यात मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाने मुंबई उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केल्याची महिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

rajesh tope
'कोरोनाचे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दोन समित्यांची नियुक्ती; तर, मुंबईसाठी स्वतंत्र समिती'
author img

By

Published : Apr 14, 2020, 7:02 PM IST

मुंबई - कोरोनामुळे राज्यात मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाने मुंबई उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केल्याची महिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णालयाच्या प्रमुखाला संबधित मृत रुग्णाची सविस्तर माहिती या समितीला पाठवणे तसेच समितीसमोर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत सविस्तर पत्र आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवले आहे.

मुंबईत कोरोनाची कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यावर उपाययोजना व विश्लेषण करण्यासाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मुत्यूच्या कारणांचे विश्लेषण आणि त्यानुसार मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही समिती उपाययोजना सुचवणार आहे. त्याचसोबत कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयांना आवश्यक त्या तयारीसाठी मार्गदर्शन देखील केले जाणार आहे.

शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी के.ई.एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे असून के. ई.एम. रुग्णालयाचे औषधी वैद्यक शास्त्र प्रमुख डॉ. मिलिंद नाडकर, सायन रुग्णालयाचे अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. नितीन कर्णीक , जे.जे. रुग्णालयाचे कम्युनिटी मेडीसीनचे प्रा.डॉ. छाया राजगुरू, जे.जे. रुग्णालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या नागर, आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे समितीच्या सदस्य सचिव आहेत.

मुंबई वगळून उर्वरित राज्य असे कार्यक्षेत्र असलेल्या या समितीत सहा तज्ज्ञ सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे अध्यक्ष आहेत. राज्याच्या समितीत माजी आरोग्य संचालक डॉ. पी.पी. डोके, औषधी वैद्यक शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. ए. एल. काकराणी व डॉ. दिलीप कदम, पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. शशीकला सांगळे, आरोग्य सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.