ETV Bharat / city

Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा अभियान! राष्ट्रध्वज जलद वितरणासाठी पालिका आयुक्तांचे आदेश

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानासाठी मुंबईतील प्रत्येक घरात महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रध्वज तिरंगा पोहोचेल अशारितीने व जलद पद्धतीने वितरण करावे. वितरण करताना चित्रीकरण करावे तसेच देखरेख पथक स्थापन करावे असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले. सर्व मुंबईकरांनी राष्ट्र ध्वजसंहितेनुसार तिरंगा ध्वजाचा मान राखून आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि अभियान कालावधी संपल्यानंतर आठवण म्हणून राष्ट्रध्वज जपून ठेवावा, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.

राष्ट्रध्वज जलद वितरणासाठी पालिका आयुक्तांचे आदेश

author img

By

Published : Aug 4, 2022, 8:32 PM IST

मुंबई - भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, या हेतूने सदर अभियान राबवले जाणार आहे.

राष्ट्रध्वज जलद वितरणासाठी पालिका आयुक्तांचे आदेश
राष्ट्रध्वज जलद वितरणासाठी पालिका आयुक्तांचे आदेश

प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत - स्वातंत्र्य लढ्यातील मुंबईचे मोलाचे योगदान पाहता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतः सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी करण्याचा आणि ते घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत असून घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती देखील केली जात आहे. या संपूर्ण पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच अंमलबजावणीच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आढावा बैठक घेतली. याप्रसंगी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चित्रीकरण करा, देखरेख पथक - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज खरेदी करून घरोघरी पोहोचवण्याचे मोठे लक्ष्य महानगरपालिकेने समोर ठेवले आहे. राष्ट्रध्वज खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता सर्व २४ विभाग कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील निश्चित घरांच्या संख्येनुसार राष्ट्रध्वज तिरंगा पुरवठा टप्प्याटप्प्याने केला जात आहे. सर्व विभाग कार्यालयांनी राष्ट्रध्वज साठा प्राप्त झाल्यानंतर दररोज त्याचे योग्य रीतीने आणि जलद कार्यवाही होईल, अशा रीतीने वितरण करावे.

संहितेप्रमाणे तिरंगा झेंडा फडकवा - घरोघरी राष्ट्रध्वज पोहोचवताना चित्रीकरण करावे. तसेच वितरण कार्यपद्धती सुरू आहे किंवा कसे, याची खातरजमा करण्यासाठी देखरेख पथक देखील नेमावे. घरोघरी तिरंगा अभियान कालावधीत सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वज संहितेप्रमाणे तिरंगा झेंडा फडकवावा. अभियान कालावधी संपल्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची आठवण म्हणून हा तिरंगा झेंडा सर्व नागरिकांनी जपून ठेवावा, या अनुषंगाने आवाहन करावे, अशी सूचनाही आयुक्तांनी केली.

३५ लाख राष्ट्रध्वजांसाठी मागणी - दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एकूण ३५ लाख राष्ट्रध्वजांसाठी मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण दहा लाख राष्ट्रध्वज तिरंगा साठा प्राप्त झाला आहे. उर्वरित सर्व साठा टप्प्याटप्प्याने येत्या तीन दिवसात प्राप्त होणार आहे. प्राप्त झालेला साठा विभाग कार्यालयांनी नोंदवलेल्या पूर्व मागणीनुसार त्या त्या प्रमाणात वितरित केला जात आहे, अशी माहिती उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार यांनी याप्रसंगी दिली.

हेही वाचा - Rahul Gandhi : राहुल गांधींचं मोदींना थेट चॅलेंज.. म्हणाले, 'काय करायचं ते करा, मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.