ETV Bharat / city

चौकशीसाठी भारती सिंहने लावली एनसीबी कार्यालयात हजेरी

भारती सिंहदेखील मुंबईतील एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे.

भारती सिंह
भारती सिंह
author img

By

Published : Dec 21, 2020, 3:36 PM IST

Updated : Dec 21, 2020, 4:29 PM IST

मुंबई - अर्जुन रामपाल चौकशीसाठी सकाळीच एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. त्यानंतर आता भारती सिंहदेखील मुंबईतील एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली होती. काही वेळातच भारती सिंह व तिचा पती एनसीबी कार्यालयातून बाहेर पडत घराकडे रवाना झाले आहेत.

भारती सिंह चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल

न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, अभिनेत्री भारती सिंह आज एनसीबी कार्यालयात हजेरीसाठी दाखल झाली होती. सोबत पती हर्षसुद्धा उपस्थित होता.

अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल

अमली पदार्थ प्रकरण आणि बॉलिवूड कनेक्शन सध्या सर्वत्र गाजत आहे. अनेकांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल आज चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाला आहे. त्यांची आज दुसऱ्यादा चौकशी करण्यात येत आहे.

अर्जुन रामपालला अमली पदार्थ तस्करीप्रकरणी एनसीबीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले होते. त्याला 16 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र, वैयक्तिक अडचणीमुळे तो चौकशीसाठी हजर होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याने चौकशीसाठी हजर होण्यासाठी 21 डिसेंबरची वेळ मागून घेतली होती.

Last Updated : Dec 21, 2020, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.