ETV Bharat / city

विधानभवनात 'कोटिंग सॅनिटाइझेशन', तीन महिन्यापर्यंत राहणार प्रभाव

विधानभवन परिसरात असलेल्या अनेक मंत्र्यांचे दालने आज सकाळपासून कोटिंग सॅनिटाइज केली जात आहेत. यामुळे या परिसरात असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना या कोटिंगचा त्रास तातडीने होऊ नये म्हणून त्यांना तात्पुरते दूर ठेवले जात आहे. हे कोटिंग पुढील तीन महिने विविध प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी प्रभावी ठरते.

विधानभवन न्यूज
विधानभवन न्यूज
author img

By

Published : Sep 5, 2020, 7:10 PM IST

मुंबई - सोमवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनासाठी राज्य विधीमंडळाकडून विविध प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. यासाठी विधान भवनातील प्रत्येक भाग कोटिंग सॅनिटाइज करून घेतला जात आहे. हे कोटिंग पुढील तीन महिने विविध प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी प्रभावी ठरते. यामुळे संपूर्ण विधानमंडळ आणि परिसर हा या पद्धतीच्या कोटिंगने सॅनिटाइज करून घेतला जात आहे.

कोटिंग सॅनिटाइझेशन
कोटिंग सॅनिटाइझेशन
विधानभवनात 'कोटिंग सॅनिटाइझेशन'
कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर विधानमंडळाच्या सोमवारपासून सुरुवात होत असलेल्या पावसाळी अधिवेशनासाठी विधान मंडळाकडून अनेक प्रकारची खबरदारी घेतली जात आहे.आज दिवसभरात विधान मंडळ आणि त्या परिसरात विधानसभा आणि विधान परिषद सदस्य सोबतच विधानमंडळातील अधिकारी-कर्मचारी यासोबतच सुरक्षारक्षक पोलीस यंत्रणा माध्यम प्रतिनिधी प्रतिनिधी आदींची तब्बल 1200 हुन अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर दुसरीकडे विधानमंडळातील प्रत्येक मंत्र्यांचे दालन सभागृह सभागृहातील विविध दालने यासोबतच उच्चस्तरीय अधिकारी यांचे कार्यालय यांना कोटिंग सॅनिटाइज करून घेतले जात आहे. यासाठी एका द्रूम नावाच्या खाजगी कंपनीकडून हे जर्म शिल्ड (germ shield) नावाचे हे कोटिंग सॅनिटाइजचे काम करून घेतले जात आहे. कोरोना आणि विविध प्रकारच्या घातक विषाणूला रोखण्यासाठी हे कोटिंग सॅनिटाइज टीन महिने आपला प्रभाव टिकवून ठेवत असल्याचे सांगण्यात येते. विधानभवन परिसरात असलेल्या अनेक मंत्र्यांचे दालने आज सकाळपासून कोटिंग सॅनिटाइज केली जात आहेत. यामुळे या परिसरात असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना या कोटिंगचा त्रास तातडीने होऊ नये म्हणून त्यांना तात्पुरते दूर ठेवले जात आहे. कोटींग झालेल्या दालनांत समोर कोटिंग करणाऱ्या कंपनीचे मोठे फलक लावून त्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.