ETV Bharat / city

CNG price hike: सीएनजीसह पीएनजी पुन्हा महागला.. रिक्षा, टॅक्सीचे भाडे महागण्याची शक्यता

author img

By

Published : Apr 6, 2022, 11:51 AM IST

Updated : Apr 6, 2022, 12:22 PM IST

मुंबईत पुन्हा एकदा सीएनजी ( CNG price hike ) आणि पीएनजीच्या किमती वाढल्या असून अनुक्रमे प्रति किलो 5 आणि 7 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने दरात मोठी वाढ केली आहे. नवीन दरानुसार आता सीएनजी 67 रुपये प्रति किलो आणि पीएनजी 41 रुपये किलो होणार आहे.

CNG price hike mumbai
सीएनजी दरवाढ मुंबई

मुंबई - मुंबईत पुन्हा एकदा सीएनजी ( CNG price hike ) आणि पीएनजीच्या किमती वाढल्या असून अनुक्रमे प्रति किलो 5 आणि 7 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने दरात मोठी वाढ केली आहे. नवीन दरानुसार आता सीएनजी 67 रुपये प्रति किलो आणि पीएनजी 41 रुपये किलो होणार आहे. राज्य सरकारने व्हॅट कमी केला होता, त्यामुळे सीएनजीची किंमत कमी होती. मात्र, आता महानगर गॅस लिमिटेडने दरवाढ केल्याने सर्वसामान्यांची जी सोय होती तीच हिरावून घेतली आहे.

हेही वाचा - स्वतःवर कारवाई झाली तर असत्यमेव जयते - भाजप नेते सुधीर मुनगंटीवार

चार दिवस सुखाचे : व्हॅट कमी केल्याचा फायदा सर्वसामान्यांना बराच काळ मिळाला नाही. अवघे चारच दिवस उलटले आणि सीएनजीच्या किमतीत किलोमागे ७ रुपये आणि पीएनजीच्या किमतीत ५ रुपयांनी वाढ होत आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बुधवार 6 एप्रिलला सकाळी जेव्हा लोक घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना सीएनजी 7 रुपयांनी आणि पीएनजी 5 रुपयांनी महाग मिळेल.

राज्य सरकारकडून वॅटमध्ये कपात : राज्य सरकारने सीएनजीवरील व्हॅट साडेतेरा टक्क्यांवरून कमी केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हॅट कपातीची अधिसूचना जारी केली होती. १ एप्रिलपासून सुधारित दर लागू करण्यात आला. त्यामुळे, महाराष्ट्रात सीएनजी सहा रुपयांनी तर पीएनजी साडेतीन रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र, आता दर वाढल्याने नागरिकांचा खिसा सैल होणार आहे.

हेही वाचा - अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे माजी प्रमुख आकार पटेल यांना देश सोडण्यापासून रोखले

Last Updated : Apr 6, 2022, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.