ETV Bharat / city

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी उद्योग क्षेत्राचे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

राज्य सरकार सतर्क झाले असून उद्योग क्षेत्र, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, अर्थचक्र आणि जीवनचक्राची गती कायम कशी राहील, असे नियोजन करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

author img

By

Published : Jul 16, 2021, 6:25 PM IST

मुंबई - राज्यात तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवला जातो आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले असून उद्योग क्षेत्र, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, अर्थचक्र आणि जीवनचक्राची गती कायम कशी राहील, असे नियोजन करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपरमुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, आरोग्यसंचालक रामस्वामी यांच्यासह पोलीस महासंचालक संजय पांडे, सीआयआयचे पश्चिम विभागाचे चेअरमन त्यागराजन, महाराष्ट्र चेअरमन सुधीर मुतालिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणची गर्दी थांबवा

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला केला आहे. दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. तोपर्यंत तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या साडे आठ हजार ते नऊ हजारावर स्थिरावली आहे, अजूनही ती त्या खाली जातांना दिसत नाही. उलट काही जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढतांना दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. अशा स्थितीत तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आरटीपीसीआर चाचण्याही वाढवा, पर्यटनस्थळी होणारी गर्दी तातडीने थांबवा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

ऑक्सिजन निर्मिती वाढवा

जगातील अनेक देशात तिसरी लाट येण्यास सुरुवात झाली आहे, तसे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीरही केले आहे. ब्रिटनसारख्या देशात रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ज्या देशात लसीकरण झाले त्या देशातही पुन्हा नव्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे आताच्याच कालावधीसाठी नाही तर पुढील एक दोन वर्षासाठी आवश्यक आहे. केंद्र सरकारने ही तिसऱ्या लाटे संदर्भात सर्व राज्यांना तशा सुचना दिल्या आहेत. राज्यात आजघडीला १३०० मे.टन ऑक्सीजन निर्मिती होते. तर तिसऱ्या लाटेत दर दिवशी ४००० ते ४५०० मे.टन ऑक्सीजनची महाराष्ट्राला गरज लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे ऑक्सीजन निर्मितीला वेग द्यावा, राज्यातील ऑक्सीजन साठा पुर्ण क्षमतेने भरावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.

नियमांची कडक अंमलबजावणी करा

सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका, रस्त्यावर फिरणारे नागरिक मास्क घालूनच फिरतील याची दक्षता घ्या, ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. त्या क्षेत्राला कंटेंमेंट झोन जाहीर करून त्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन करा. गाव, वाड्या वस्तींवर लक्ष केंद्रीत करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मेहनतीवर पाणी पडू देऊ नका

राज्यात लसीकरणास विलंब होत आहे. काही नागरिकांना तर अजून पहिला डोसही मिळाला नाही अशा स्थितीत वाढती रुग्णसंख्या, डेल्टा विषाणुचा उद्भव आणि तिसरी लाट धोक्याची ठरू शकते हे लक्षात घ्या, आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी पडू देऊ नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. ऑक्सीजन निर्मितीसाठी तसेच उद्योग सुरळित सुरु राहावेत, असे आवाहन केले.

तिसऱ्या लाटेसाठी सतर्क रहा - बाळासाहेब थोरात

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना अधिक वेगाने राबवाव्याच लागतील असे प्रतिपादन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तिसऱ्या लाटेत उद्योग व्यवसाय सुरु राहण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. खासगी रुग्णालयांच्या २५ टक्के कोट्यातून उद्योजकांनी आपल्या कामगारांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. राज्यातील ऑक्सीजन निर्मिती आणि साठा वाढवण्याची गरज असून त्यादृष्टीने तयारी करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

उद्योगांच्या संपर्कात - सुभाष देसाई

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्यातील उद्योग सुरु राहावेत यादृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. राज्यातील उद्योजकांशी उद्योग विभाग सातत्याने संवाद साधत असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. सीआयआय आणि राज्यातील इतर विभागीय संघटनांसमवेत बैठका झाल्या असून त्यांच्या अडीअडचणी शासन समजून घेत असल्याची माहिती दिली. केंद्राने लसीकरणाचे डोस वाढवून द्यावेत, अशी राज्याची सातत्यपूर्ण मागणी असल्याचे देसाई म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.