मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेचे गणितं बदलण्याच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान आज सुने-सुने दिसत आहे. या ठिकाणी गेली पंधरा दिवस सातत्याने कोअर कमिटीच्या बैठका पार पडल्या. परंतु, सत्तास्थापनेचे कोणतेही गणितं न जुळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शवली होती.
हेही वाचा - सेनेच्या आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा
त्यानंतर सर्व सत्तेचे चक्र हे शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी वळले आहेत. यासंदर्भात आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्या बैठकीला भाजपचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे. परंतु, गेली पंधरा दिवस मीडियाचा जो राबता या ठिकाणी होता तो आज पूर्णतः कमी झालेला आहे.
वर्षा निवासस्थानी येणाऱ्या लोकांची संख्या देखील कमी झालेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल आम्ही सरकार स्थापन करणार नाही. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो, अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. तर, त्यापासून भाजप विरोधी पक्षात बसण्यासाठी रणनिती निश्चित करत असून कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.