ETV Bharat / city

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र; तर विरोधकांची टीका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ताज्या बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्तावाला गती देण्याची विनंती केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना देखील प्रत लिहीले आहे.

CM uddhav thackrey latest news
CM uddhav thackrey latest news
author img

By

Published : Sep 28, 2021, 8:46 AM IST

मुंबई - केंद्राच्या महत्त्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने रेड सिग्नल दाखवला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्तावाला गती देण्याची विनंती केली आहे. शिवसेनेच्या या नरमाईच्या भूमिकेवर विरोधकांनी आक्षेप घेत, कार्यद्धतीवर सडकून टीका केली आहे. शिवसेना त्याला कसा प्रत्युत्तर देते, हे पहावे लागणार आहे.

पत्रावरून मुख्यमंत्र्यांवर टीका -

राज्यात विकास आघाडी सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या काळातील अनेक निर्णय रद्द केले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी रोखून धरला. विरोधीपक्ष असलेल्या भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यावरून शाब्दिक धुमश्चक्री झाली. गेली दोन वर्ष केंद्र आणि राज्यात शिवसेनाविरुद्ध भाजपा असा राजकीय आखाडा रंगला आहे. शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर वाढल्याचा आरोपही सुरू आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची सिटी बँक गैरव्यवहार प्रकरणी 'ईडी'ने कारवाईचा बडगा उगारला. शिवसेना नेत्यांनी यावरून भाजपला टीकेचे लक्ष बनवले. एकीकडे विरोध होत असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थगित केलेले मुंबई-हैदराबाद आणि पुणे-औरंगाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी कंदील द्यावा, अशी मागणी करणारे पत्र दिले. भाजपाने यावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार आसूड ओढले आहे.

हेही वाचा - राज्यातील महापालिका, नगरपालिकांमधील बहुसदस्यीय पद्धतीबाबत संभ्रमावस्था.. तज्ञांची मतेही परस्परविरोधी

'विरोध करणे हाच मुख्यमंत्र्यांची उद्योग' -

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनला शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला विरोध हा केवळ राजकीय विरोध होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्रातून हे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्र्यांना विकासकामांचा काही देणेघेणे राहिलेले नाही. सत्तेत राहणे आणि आधीच्या सरकारने केलेल्या कामांना विरोध करणे हेच काम उरल्याची टीका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

'विकासासाठी बुलेट ट्रेन फायद्याची' -

मुंबई आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने बुलेट ट्रेनची आवश्यकता आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला शहरे आणि गाव जोडण्यासाठी बुलेट ट्रेन फायदेशीर ठरेल. मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासातदेखील महत्त्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय विरोध बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेल्या बुलेट ट्रेनच्या प्रस्तावासाठी केलेली विनंती नक्कीच स्वागतार्ह आहे, असे रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाश गुप्ता म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेन संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती गुप्ता यांनी केली आहे.

'दिल्लीच्या बैठकीनंतर सूत्र हल्ली' -

नक्षलवाद प्रभावित राज्यांची दिल्ली येथे रविवारी बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे यावेळी उपस्थित होते. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक संपल्यानंतर चर्चा झाल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत परतल्यानंतर केंद्राने अडवून ठेवलेल्या बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी पंतप्रधानांना गळ घातली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून टाकला जाणारा दबाव, शिवसेनेची सातत्याने होणारी बदनामी रोखण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मांडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

युती अशक्य? -

2014च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजपाने शिवसेनेची मोठी फरफट केली. सत्तेमध्ये ही महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवत शिवसेनेला दुय्यम खाती दिली, असा आरोप अनेकदा शिवसेना नेत्यांनी केला. 2019च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत लढले. मुख्यमंत्री कोणाचा आणि खाते वाटपावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी अजित पवार यांच्याशी संगनमत करून पहाटे पाच वाजता शपथविधी करत सरकार स्थापन केले. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. मुख्यमंत्री यांनीही भाजपाला चपराक देण्यासाठी आजपर्यंत कधीही एकत्र आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेस सोबत युती केली. शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेस सोबत गेल्याने भाजपाने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष बनवणे. मात्र, शेंडी आणि जानव्याची हिंदुत्त्व आम्ही मानत नाही, असे खडे बोल मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाला सुनावले. आता राज्यातील बदलत्या वातावरणानंतर शिवसेना-भाजपा युतीची चर्चा, तर्कवितर्कांना ऊत आला आहे. मात्र, शिवसेना भाजपा सोबत जाण्याची चूक पुन्हा करणार नाही, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त केले आहे.

हेही वाचा- जीएसटी प्रणाली सोपी, दोषविरहीत करण्यासाठी केंद्रस्तरीय मंत्रिगट; अजित पवार अध्यक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.