ETV Bharat / city

मुख्यमंत्री रविवारी चिपळूणच्या दौऱ्यावर; पूरस्थितीची करणार पाहणी - Uddhav Thackeray to visit chiplun

चिपळूणमधला पूर आता ओसरला आहे. मात्र आता येथील लोकांचा संघर्ष सुरू झालाय तो म्हणजे जगण्यासाठी. पाणी नाही, खायाला नाही, लाईट नाही, घरात राहण्याजोगी जागा नाही. घरात-बाहेर चिखल आणि फक्त चिखलच. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री चिपळूणच्या दौऱ्यावर येणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 25, 2021, 5:19 AM IST

मुंबई - राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्री रविवारी सकाळी ११ वाजता पुराचा फटका बसलेल्या चिपळूणला पोहोचणार आहेत.

मुख्यमंत्री रविवारी सकाळी ११ वाजता पुराचा फटका बसलेल्या चिपळूणला पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री दुपारी सव्वा बारा वाजता पुरस्थितीची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसमवेत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित असणार आहेत.

हेही वाचा-तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचे पुनर्वसन करू - मुख्यमंत्री

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळईमध्ये 32 घरांवरती दरड कोसळल्याने तब्बल 47 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाडमधील तळीये गावाची पाहणी केली.

हेही वाचा-कृष्णा आणि वारणेचा पूर हळूहळू ओसरेल - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

यापूर्वीच मदत जाहीर -

अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच, यामध्ये जखमी झालेल्या सर्व व्यक्तींच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यांनी जाहीर केली आहे.

अशी आहे चिपळूमधील परिस्थिती-

  • जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला आहे. यामुळे चिपळूण शहराला पावसाच्या पाण्याने वेढले होते. चिपळूणच्या अपरांत हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चिपळूण नगरपालिकेच्या समोर हे अपरांत हॉस्पिटल आहे.
  • चिपळूणमध्ये महापुराने व्यापाऱ्यांची किती दाणादाण उडवून दिलेली आहे, ती पुरानंतरची दृश्य बघितल्यावर लक्षात येते. या पुराने व्यापाऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. लाखो-करोडोंचे नुकसान या पुराने झालेले आहे. चिपळूण शहरातील सर्वात मोठं खरेदी मार्केट म्हणजे किंग सुपर मार्केट, भोगाळे मध्ये असलेलं हे मार्केट पुर्णतः पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे जवळपास दीड ते दोन कोटींचं नुकसान झालेले आहे.
  • चिपळूणमधला पूर आता ओसरला आहे. मात्र आता येथील लोकांचा संघर्ष सुरू झालाय तो म्हणजे जगण्यासाठी. पाणी नाही, खायाला नाही, लाईट नाही, घरात राहण्याजोगी जागा नाही. घरात-बाहेर चिखल आणि फक्त चिखलच. अशा परिस्थितीमध्ये राहायचं कसं? जगायचं कसं? असा प्रश्न उभा राहिला आहे. शिवाय पाणी नसल्यानं पावसाचं पाणी अनेक पूरग्रस्त भरताना दिसत आहेत. त्यामुळे आता पूर ओसरला असला तरी अतिशय भयावह परिस्थिती चिपळूण परिसरात पाहायला मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.