ETV Bharat / city

Vijay Diwas - बांगलादेश मुक्तिसंग्राम सुवर्ण महोत्सवी विजय दिवस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सैन्याच्या शौर्याला वंदन

author img

By

Published : Dec 16, 2021, 4:37 PM IST

बांगलादेश मुक्ती संग्रामच्या सुवर्ण महोत्सवी विजय दिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ( cm uddhav thackeray tribute to soldiers ) भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन केले. या युद्धातील हुतात्मा वीर जवानांच्या स्मृतींनाही त्यांनी अभिवादन केले.

cm uddhav thackeray tribute to soldiers
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सैन्य वंदन

मुंबई - बांगलादेश मुक्ती संग्रामच्या सुवर्ण महोत्सवी विजय दिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ( cm uddhav thackeray tribute to soldiers ) भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन केले. या युद्धातील हुतात्मा वीर जवानांच्या स्मृतींनाही त्यांनी अभिवादन केले.

हेही वाचा - BEST Super Saver Scheme : बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी सुपर सेवर योजना

संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बांगलादेश मुक्ती संग्रामाचा आज सुवर्ण महोत्सवी विजय दिवस. या युद्धातून भारतीय सैन्याने जगासमोर मानवी मुल्यांच्या रक्षणासाठी शौर्य आणि धैर्याचे उत्तम उदाहरण ठेवले. आपल्या शूरविरांनी प्राणांची बाजी लावली. यात महाराष्ट्र सुपुत्रांनीही पराक्रमाची शर्थ केली. या युद्धातील हुतात्मा वीर जवानांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. या सर्वांच्या त्याग, समर्पणाला शतशः वंदन. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांच्या धीरोदात्ततेलाही नमन करत वीर जवानांबाबत मुख्यमंत्र्यांनी आदर व्यक्त केला.

भारताच्या विजयानंतर जगाच्या नकाशावर झाला बांग्लादेशचा जन्म

16 डिसेंबर हा दिवस भारतात 'विजय दिवस' ( Vijay Diwas ) म्हणून साजरा केला जातो. भारताने केवळ या युद्धात भागच घेतला नाही तर, पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशला स्वातंत्र्य केले. तो दिवस होता 16 डिसेंबर 1971. या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव ( India-Pakistan War 1971 ) केला आणि जगाच्या नकाशावर बांग्लादेशला जन्म दिला. बंगाली, मुस्लीम आणि हिंदूंना वाचवण्यासाठी भारत पाकिस्तानशी युद्ध करण्याचा भारत सरकारने 3 डिसेंबर 1971 रोजी निर्णय घेतला होता. हे युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये 13 दिवस चालले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने 93 हजार सैनिकांसह भारतासमोर शरणागती पत्करली होती. भारतीय लष्कराचा पाकिस्तानविरुद्धचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता.

युद्धाचे कारण -

1971 पूर्वी बांगलादेश हा पाकिस्तानचा एक भाग होता, ज्याला 'पूर्व पाकिस्तान' ( East Pakistan ) म्हटले जात असे. पूर्व पाकिस्तानातील लोकांना मारहाण, शोषण, महिलांवर बलात्कार आणि पाकिस्तानी सैनिकांकडून लोकांची हत्या करण्यात आली. पाकिस्तानच्या छळाच्या विरोधात भारताने बांगलादेशला पाठिंबा दिला. पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे लष्करी शासक जनरल अयुब खान यांच्या विरोधात प्रचंड असंतोष होता. १६ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा (Lieutenant General Jagjit Singh Arora ) यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण केले. हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या विजयानंतर बांगलादेश जगाच्या नकाशावर उदयास आला.

हेही वाचा - Etv Bharat Special : निर्भया हत्याकांडानंतर राज्यात महिला अत्याचाराविरोधात कठोर नियम; मात्र अत्याचार सुरूच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.