मुंबई - क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात धाड टाकणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे वादात सापडल्याने राज्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघत आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिली वळसे-पाटील यांच्यात समीर वानखेडे प्रकरणावर बैठक झाल्याचे सूत्राने सांगितले.
क्रूझवर एनसीबीने टाकलेल्या धाडीच्या प्रकरणात मुख्य पंच प्रभाकर साईलने पोलिसात तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारीत आपल्या सुरक्षेला धोका म्हटले आहे. यापूर्वी प्रभाकर साईलने किरण गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एनसीबीच्या धाडीला वेगळे प्रकरण लागले आहे.
हेही वाचा-मध्यप्रदेशात आढळला कोरोनाचा नवा AY-4 व्हेरिएंट, 7 जवान बाधित
दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रभाकर साईलला संरक्षण पुरविण्याची मागणी केली आहे. तसेच एसआयटी नेमावी, अशीही मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा-आम्हाला अमली पदार्थांचे सेवन करणारे पर्यटक नको- गोव्याचे पर्यटनमंत्री
हेही वाचा-आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावी येणार पोलिसांना शरण